अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 15 नोव्हेंबर 2021, स. 11.15
● रविवारी अहवालात 29 नवीन बाधित
● एकूण 1 हजार 948 जणांची तपासणी
● जिल्ह्यात अल्प गतीने वाढ सुरूच
● चौदाव्या दिवशीही वाढ 50 च्या खाली
● रविवारी फक्त 1,308 जणांना लस
सातारा / प्रतिनिधी :
नोव्हेंबर महिन्याचा आरंभ जिल्ह्याला दिलासादायक ठरलेला आहे. मात्र गत पंधरा दिवसात एक तारखेची 50 बाधित वाढ सोडता गेली सलग चौदा दिवस बाधित वाढ 50 च्या खाली राहिलेली आहे. यामध्ये एकदा 11 एवढ्या नीचांकी संख्येने नोंदवली गेली. मात्र त्यानंतर गत आठ दिवस झाले बाधित वाढ 20 ते 30 दरम्यान स्थिर असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही एक टक्केवर स्थिर आहे.
रविवारी अहवालात 29 जण बाधित
प्रशासनाकडून रविवारी रात्रीचा अहवाल सोमवारी सकाळी देण्यात आला. यामध्ये एकूण 29 जणांचा अहवाल बाधित आलेला असून एकूण 1 हजार 948 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये पॉझिटिव्हिटी दर एकच्या वर राहिलेला असून सध्या तरी जिल्ह्यात बाधित वाढीचा मोठा वेग मंदावला असला तरी अल्प गतीने सुरू असलेली वाढ थांबलेली नाही. काही तालुके कोरोना मुक्तही झालेले आहेत मात्र तिथे अधून मधून एक अंकी संख्येने बाधित वाढ समोर येत आहे.
अल्प वाढ असली तरी काळजी घ्या
दीपावलीनंतर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाने मान टाकल्यानंतर आता नागरिकांच्या मानावर झालेल्या आहेत. त्यातील बहुसंख्यजण आता मास्कचा वापर टाळू लागले आहेत तर अनेकजण दुसरा डोस घेण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे. एकूणच सध्यातरी कोरोणाचे संकट टळताना दिसत असले तरी आणि लसीकरण ही चांगल्या गतीने झालेले असले तरी अद्याप काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गर्दीत जाताना मास्कचा वापर करणे गरजेचे असून शंभर टक्के लसीकरणासाठी जिल्हावासियांनी प्रशासनाला साथ दिली पाहिजे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,62,722
एकूण बाधित 2,51,679
कोरोनामुक्त 2,44,038
एकूण मृत्यू 6,458
सक्रीय रुग्ण 308
रविवारी जिल्हय़ात
बाधित 31
कोरोनामुक्त 00
मृत्यू 00









