प्रतिनिधी / कोल्हापूर
रंकाळा येथील बांधकामावर पाणी मारताना शॉक लागून अल्पवयीन मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. अंकिता अनिल शेळके ( वय 15 रा. राजेंद्रनागर, सध्या रा रंकाळा) असे तिचे नाव आहे. या बाबाबतची फिर्याद महेश ब्रह्मदेव सोनवणे ( 35 रा. राजेंद्रनागर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. यानुसार बांधकाम व्यावसायिक संदीप संकपाळ ( रा नागाला पार्क ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप संकपाळ यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचे रंकाळा स्टँड नाजीक नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर नूतन अनिल शेळके ह्या पाणी मारण्याचे काम करतात. बांधकामावरील वायरिंग खराब झाले असल्याची कल्पना त्यांनी संदीप संकपाळ यांना दिली होती. काल, शनिवारी सकाळी अंकिता पाणी मारण्यासाठी गेली. तिने मोटार सुरू केली असता तिला विजेचा जोराचा शॉक लागला. या धक्क्याने ती जागीच कोसळली. तिला उपचारासाठी रुग्णागलाय नेले असता उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









