विवाहाने जातबदलत नसल्याचा निष्कर्ष
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक स्वप्नल जोपळे यांना शासनाने सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी दिल़ी स्वप्नल जोपळे या मुळच्या अमागास प्रवर्गातील आहेत. मात्र त्यांनी आंतरजातीय विवाह केला व त्याद्वारे अनुसूचित जातीच्या आधारे नोकरी मिळवल़ी मात्र विवाह प्रमाणपत्र लागू होत नसल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, वरिष्ठ लिपिक स्वप्नल जोपळे यांच्या सेवापुस्तिकेवर त्यांची जात अनुसूचित जमाती अशी नोंद आह़े ही नोंद तहसीलदार राजापूर यांच्या 1996 रोजीच्या प्रमाणपत्रावरुन घेतल्याचे नमूद आह़े त्यानंतर उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांनी 1997 रोजी दिलेले जात प्रमाणपत्रही जोपळे यांच्या सेवापुस्तिकात उपलब्ध आह़े त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र हे जमाती संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे जमाती पडताळणी समिती नाशिक यांच्या 1997 अन्वये प्राप्त झाले होते.
आदेशात नमूद करण्यात आले आहे की स्वप्नल जोपळे या पूर्वाश्रमीच्या श्रध्दा राणी एकनाथ कुलकर्णी असून जन्माने त्या हिंदू ब्राम्हण आहेत. त्या खुल्या प्रवर्गात मोडतात. त्या 16 डिसेंबर 1996 ला सेवेत रुजू झाल्या त्यापूर्वी अनुसुचित जाती प्रवर्गातील सुनील रामा जोपळे यांच्याशी 1995 मध्ये विवाहबध्द झाल्या. हा त्यांचा विवाह नोंदणी पध्दतीने झाला आहे.
पूर्वाश्रमीच्या अमागास म्हणजेच खुल्या प्रवर्गातील मात्र विवाह अनुसूचित जातीच्या व्यक्तीबरोबर झाल्याने पतीच्या जातीचा वापर करुन अनुसूचित जमातीच्या राखीव पदावर नोकरी मिळवण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या वरिष्ठ लिपिक स्वप्नल जोपळे यांनी केला होत़ा मात्र जात ही जन्माने व वडिलांच्या बाजूने प्राप्त होत़े आंतरजातीय विवाह केला तरी पतीला मिळणारे अनुसूचित जमातीचे संविधानिक लाभ घेण्यास ती व्यक्ती पात्र होवू शकत नाह़ी यामुळे त्यांची अनुसूचित जमाती प्रवर्गातून मिळालेली सेवा व नियमबाह्य पदोन्नती रद्द होत़े त्यानुसार ही कार्यवाही झाली आहे. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जोपळे यांची नियुक्ती आदिवासी विकास विभागाच्या निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार करण्यात आली असली तरी सर्वोच्य न्यायालयाच्या एका निर्णयानुसार राज्य शासनाने 1999च्या शासन निर्णयाव्दारे आंतरजातीय विवाहामुळे अमागासवर्गीय व्यक्तीला मिळणारे आरक्षणाचे लाभ, घटनात्मक तरतुदीशी विसंगत असल्यामुळे रद्द करत या आधीचे शासन निर्णयही रद्द करण्यात आले आहेत़ स्वप्नल जोपळे या अमागास जातीत जन्मलेल्या असून त्यांनी अनुसूचित जमातीतील व्यक्तीशी विवाह केल़ा त्यामुळे 1999 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार मागासवर्गीयांसाठीच्या सवलती, फायदे मिळवण्यास पात्र नसल्यामुळे जोपळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आह़े, असे ही ओदशात नोंदवण्यात आले आहे.








