प्रतिनिधी / बेळगाव
बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. मात्र या चौकातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे चौकातील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौकपर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्यात येत असून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे. पण बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतच्या एका बाजूच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खोदाई करून ठेवण्यात आली असल्याने हा रस्ता बंद आहे. तसेच बसवेश्वर चौकातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. जलतरण तलावाच्या बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. तसेच आता दुसऱया बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. बसवेश्वर चौकातील रस्ता काँक्रिटीकरणास प्रारंभ करण्यात आल्याने चौकात वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावर वाहनांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असते. पण आता काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. येथील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.









