कुपवाड / प्रतिनिधी
कोरोना काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कंपनीच्या कामगारांची बसमधून गर्दीने व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या कुपवाड एमआयडीसीतील इंडिया गारमेंट या कंपनीला शुक्रवारी तब्बल ३० हजाराचा दंड ठोठावण्यात आला.
कुपवाड महापालिका प्रशासन आणि कुपवाड पोलिसांच्या पथकाने तपासणी करून संयुक्तरित्या ही कारवाई केली. कंपनीच्या बसमध्ये नियमापेक्षा जादा कामगारांची वाहतूक करताना आढळून आल्याने कंपनीकडून ३० हजाराचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे व सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर शासनाने कड़क निर्बंध लादले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन व कुपवाड पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथील सोसायटी चौकात नाकाबंदी केली आहे. दररोज वाहनचालक व पादचारी यांची तपासणी सुरू होती. यावेळी कुपवाड एमआयडीसीतील इंडिया गारमेंट कंपनीची कामगार वाहतूक करणारी बस आली.
या बसची तपासणी करताना बसमध्ये नियमबाह्य कामगारांची संख्या आढळून आली. कंपनीच्या बसचालकाने कोरोना कालावधीत शासनाने दिलेल्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.पोलिस व महापालिका प्रशासनाने कंपनीच्या बसचालकाला ३० हजार रुपयांचा दंड करून तो वसूल केला. या कारवाईत महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, समन्वयक, मुकादम व पोलिस कर्मचारी सहभागी होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








