तारक मेहता का उल्टा चष्मामधलं बबिता हे पात्र लोकप्रिय करणारी अभिनेत्री म्हणजे मुनमुन दत्ता. गोरीगोमटी, सोनेरी केसांची मूनमून खूप आकर्षक दिसते. मुनमुनने आपला फिटनेस जपला आहे. कमनीय बांधा टिकवून ठेवण्यासोबतच तंदुरूस्त राहण्यासाठी ती योगा करते. मुनमुन सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असून चाहत्यांसाठी योगा करतानाचे फोटो पोस्ट करत असते. मुनमुनच्या आरस्पानी सौंदर्याचं आणि कमनीय बांध्याचं रहस्य आपण जाणून घेऊ.
- मुनमुन अगदी साधी, सोपी आसनं करून फिटनेस टिकवून ठेवते. मुनमुन बालासन करते. यामुळे पाठ, मांडय़ा, पोटर्यांवर ताण येतो. कंबरेचा घेरही कमी होतो.
- मुनमुनला गोमुखासन खूप आवडतं. हे आसन करताना आपलं शरीर गायीचा तोंडासारखं दिसतं. म्हणून या आसनाला गोमुखासन असं म्हटलं जातं.
- मुनमुन प्रभावी असं मार्जरासनही करते. या आसनामुळे पाठीचा कणा तसंच पाठीचे स्नायू लवचिक होतात. पोट कमी करण्यासाठीही मार्जनासन करता येईल. या आसनामुळे चेहर्यावर छान चमक येते. मुनमुनच्या तेजस्वी चेहर्याचं हेच गुपित असावं.
- सेतुबंधासन म्हणजे ब्रीज पोझ. या आसनामुळे कंबर लवचिक होते. तसंच मांडय़ा सुडौल होतात. या आसनामुळे मूड चांगला होतो. तसंच ताणही दूर होतात असं मुनमुन सांगते.









