रत्नागिरीत तत्कालीन बँक मॅनेजरसह 23 जणांविरूद्ध गुन्हा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील युनियन बँक येथे कर्जप्रकरणासाठी बनावट कागदपत्रे सादर करून बँकेला 5 कोटी 12 लाख 98 हजार रूपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आह़े बँकेच्या नियमित ऑडिटमध्ये हा प्रकार समोर आला आह़े त्यानुसार तत्कालीन बँक मॅनेजरसह 23 जणांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
या प्रकरणी विरेश चंद्रशेखर (36, ऱा जोशी पाळंद, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015-16 मध्ये रत्नागिरीमधील 20 जणांनी जयस्तंभ येथील युनियन बँकेच्या शाखेत शेती पीकपाणी कर्जासाठी अर्ज केला होत़ा हे कर्ज मिळविण्यासाठी संबंधितांनी सातबारा उतारा, भाडे करारपत्र, मुखत्यारपत्र आदी बनावट कागदपत्रे बँकेला सादर केल़ी दरम्यान बँकेने या कागदपत्रांची शहानिशा न करताच 5 कोटी 12 लाख 98 हजार रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आल़े
दरम्यान अनेक वर्ष उलटूनही या कर्जाची परतफेड कर्जवाटप करण्यात आलेल्या संशयितांकडून करण्यात आलेली नाह़ी यासंबंधी बँकेकडून करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये कर्ज घेण्यास पात्र नसतानाही संशयितांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे समोर आल़े तसेच या कागदपत्रांची बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाने कोणतीही शहानिशा केली नसल्याचे नमूद करण्यात आल़े यासंबंधी शहर पोलिसांत तत्कालीन बँक मॅनेजरसह 23 जणांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आल़ी पोलिसांनी संशयितांविरूद्ध भादंवि कलम 406,409,420,465,468,471,472,199,200,193,120 (ब) नुसार गुन्हा दाखल केल़ा या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत़









