प्रतिनिधी /पणजी
बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष या 26 वषीय युवकाचा जिहादी धर्मांधांनी काल शिमोग्गा,कर्नाटक येथे भरदिवसा भर रस्त्यात भोसकून केलेल्या निर्घृण हत्येचा संतप्त, तीव्र निषेध व्यक्त करण्याबरोबरच, पा?पुलर प्रंट ऑफ इंडिया ( पी.एफ.आय.) या आतंकवादी व पाकिस्तानी आय.एस.आय.एस.आय. या संघटनांशी संबंधित जिहादी इस्लामिक संघटनेवर व तिच्याशी संलग्न एस.डी.पी.आय. या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची जोरदार मागणी, गोव्याच्या “हिंदू रक्षा महाआघाडी” चे राज्य निमंत्रक, प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यानी आज येथे एका पत्रकार परिषदेत केली. येत्या 2/3 दिवसात जिहादला बळी पडलेला कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधाचे कार्यक्रम गोव्यात किमान 50 ठिकाणी होतील अशी माहिती त्यानी दिली. व्यासपीठावरील मान्यवरांत, डा?. सूरज काणेकर( सुराज्य संस्था), प्रा. प्रविण नेसवणकर( भारतमाता की जय संघ), गोविंद चोडणकर( सनातन संस्था), नितीन फळदेसाई( राष्ट्रीय बजरंग दल) संदीप पाळणी( सह-निमंत्रक) यांचा समावेष होता.
देश अस्थिर करण्यासाठी योजनाबद्धपणे ” हिजाब ” च्या मुद्यावरून, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आता जिहादी ठिणगी पेटवण्यामागे आतंकवादी पी.एफ. आय. चा हात आहे याचे धागेदोरे सरकारला मिळालेच आहेत.
खुद्द आसामचे भाजपा.मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनीही, पी.एफ. आय. या राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱया संघटनेवर बंदी घालण्याची मागणी कालच केंद्र सरकारकडे केली आहे.
अलिकडेच गोव्यात आपल्या एस.डी.पी.आय.या राजकीय शाखेची स्थापना करताना फातोर्डा मडगाव येथे जमलेल्या 2500 धर्मांधांनी ” पाकिस्तान जिंदाबाद” च्या घोषणा दिल्याचा व्हिडियो व्हायरल झालेले आहे. बाबरी मशीद “त्याच” ठिकाणी अयोध्येत बांधूं अशा आशयाचे चिथावणीखोर फलक/पोस्टर्स, गोव्यात सर्वत्र लावण्याचे काम पी.एफ. आय.ने केल्याचे पोलिस व सरकारला माहित आहे.
छोटय़ा गोव्यात थोडथोडके नव्हेत तर 85000 रोहिंग्या व बांगलादेशी बेकायदा घूसखोर, येथील सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आधारकार्ड, रेशनकार्ड देऊन गेल्या 10 वर्षात पोसले आहेत. गोव्यात भविष्यात त्यामुळे स्फोटक परिस्थिती उदभवू शकते.
त्यासाठी गोव्यातील सर्व लहान मोठय़ा हिंदू संघटनाना ,समान कार्यक्रमाच्या आधारावर एका व्यसपीठावर आणण्याचे कार्य हिंदू रक्षा महाआघाडी स्थापून सुरू झालेले असून आतापर्यंत 1007 संस्था सामील झालेल्या आहेत. सर्व 12 तालुक्मयात समित्या स्थापन झालेल्या आहेत. कोणताही राजकीय पक्ष हिंदूंचा वाली नसून हिंदूंनीच हिंदूंचे रक्षण करावे लागेल, अशी माहिती प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली.
डा?. सूरज काणेकर यांनी गोव्यात हिंदू सुरक्षित रहावेत यासाठी सर्व हिंदू संस्था?नी पुढाकार घेऊन ” हिंदू रक्षा महाआघाडी ” बळकट करावी असे आवाहन करत असतानाच, पश्चिम बंगाल, दिल्ली, तमिळनाडू,आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब व महाराष्ट्र या राज्यात हिंदूसमाज, मंदिरे, संतमहंत व हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या व होत असलेला अन्याय, ससेहोलपट यांची माहिती दिली.









