पशुप्रेम असावे तर असे, असे ज्या घटनेबद्दल म्हणता येईल ती घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्हय़ातील हसनपूर या गावी घडली आहे. राधेशाम नामक एका ग्रामस्थाने आपल्या लाडक्मया बकऱयाचा वाढदिवस असा धुमधडाक्मयात साजरा केला, की महनीय व्यक्तीचा सुद्धा केला जात नाही. बकऱयाच्या वाढदिवशी त्याने चक्क बेंडबाजा लावून त्याची मिरवणूक काढली आणि केकही कापला.

काही वर्षांपूर्वी राजस्थानच्या अलवर येथील जनावरांच्या बाजारातून राधेशाम यांनी हा बकरा विकत आणला होता. बकरा पाळण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. पण या बकऱयाने त्यांना असा लळा लावला आहे, की आपल्या नातवाप्रमाणे ते त्याच्यावर माया करतात. त्यांच्याबरोबर त्यांचा परिवारही या बकऱयाची अतिशय काळजी घेतो. गेल्या रविवारीच त्यांनी बकऱयाचा वाढदिवस असा दणक्मयात साजरा केला. याचे कारण विचारले असता ते म्हणतात, की जनावरांनाही माणसाप्रमाणेच भावना असतात. आपल्यासाठी काही तरी समारंभ चालला आहे, याची जाणीव त्यांना असते. त्यांनाही माणसांप्रमाणेच आनंद मिळवावासा वाटतो. त्यामुळे आम्ही बकऱयाचाही वाढदिवस अशाप्रकारे साजरा करण्याचा निर्णय घेतला. यातून पशुप्रेमाचा संदेश लोकांना देण्याचा उद्देश आहे. गावकऱयांनीही बकऱयाच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन बकऱयाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली. या कार्यक्रमाला गावचे माजी सरपंच व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. राधेशाम बकऱयाचा वाढदिवस साजरा करणार आहे, याची अनेकांना कल्पना नव्हती. पण प्रत्यक्षात सजविलेला बकरा त्यांच्यासमोर आला आणि त्याचाच वाढदिवस आहे, हे समजले. तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहिला नाही.









