साताऱयातील शाहू चौक परिसरातील घटना – 10 तोळय़ाहून अधिक दागिने चोरी
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील शाहू चौकाकडून चार भिंतीकडे जाणाऱया रस्त्यावर असलेल्या एका वयोवृध्द डॉक्टरांचा बंद बंगला फोडून अज्ञात चोरटय़ांनी 10 तोळय़ाहून अधिक दागिन्यांची चोरी केली असल्याची घटना गुरुवारी समोर आली. याबाबत डॉक्टरांच्या मुलीने शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, साताऱयातील शाहू चौकाकडून चार भिंतीकडे जाणाऱया रस्त्यावर डॉ. शशिकांत कुलकर्णी यांचा आशीर्वाद नावाचा बंगला आहे. डॉ. कुलकर्णी दि. 1 सप्टेंबरपासून बंगल्याला कुलूप लावून कामानिमित्त सपत्निक परराज्यात गेलेले आहेत. दरम्यान, त्यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे शेजाऱयांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी डॉ. कुलकर्णी यांना ही बाब कळवली.
डॉ. कुलकर्णी परराज्यात असल्याने तातडीने येवू शकत नव्हते. त्यांनी त्यांच्या पुण्यात रहात असलेल्या मुलीला ही माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी त्यांची मुलगी साताऱयात आल्यावर सायंकाळी तिने घराची पाहणी केल्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
साताऱयातील शाहू चौकात चार भिंतीकडे जाणाऱया रस्त्यावर अज्ञात चोरटय़ांनी बंद घर फोडून घरातून लाखो रुपयांचे सोने चोरुन नेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ते घर डॉक्टरचे असून कामानिमित्त ते सध्या दुसऱया राज्यात गेले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर चोरटय़ांनी घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यामध्ये सुमारे 10 तोळ्यांपेक्षा अधिक सोने चोरीला गेले असल्याचे समोर येत आहे. तक्रारदार डॉक्टर परगावी असून ते वयस्कर असल्याने साताऱयात आल्यानंतर नेमके सोने किती चोरीला गेले ते स्पष्ट होईल. रविवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेली नव्हती.









