वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील 12 बंदरांमधून मालवाहतूक एप्रिल ते फेब्रुवारीच्या कालावधीत 1.42 टक्क्मयांनी वाढून 64.29 कोटी टनावर राहिली आहे. मागील आर्थिक वर्षात 2018-19 या कालावधीत हा आकडा 63.39 कोटी टन होता. अशी माहिती भारतीय बंदरगाह संघ (आयपीए) यांच्याकडून देण्यात आली आहे.
आयपीएच्या आकडेवारीनुसार या बंदारांमधून लोखंड आर्यन मालाची वाहतून 43.11 टक्क्मयांनी वधारुन 4.99 कोटी टनावर राहिला आहे. त्याच वेळी कोळशाची वाहतूक 14 टक्क्मयांनी घटून 8.25 कोटी टनावर राहिले आहे. या 12 बंदरांतून या काळात वाहतूक 2018-19 मध्ये 3.49 कोटी टनावर लोखंड आर्यन व 9.59 कोटी टनाची कोळशाचे वाहतूक झाली आहे. अन्य समिक्षकांच्या माहितीवरुन कोकिंग आणि अन्य कोळशांची देवाणघेवाण 2.49 टक्क्मयांनी वधारुन 5.18 कोटी टनाच्या घरात पोहोचली आहे. अन्य मालांची वाहतूक 19.49 टक्क्मयांनी वधारले व कच्च्या मालांची वाहतुकीत 0.68 टक्क्मयांनी घसरली आहे. या बंदारांतून एकूण मालांची वाहतूक 60 टक्क्मयांपर्यंत होत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
बंदरांचा समावेश
देशातील जवळपास 12 मोठय़ा बंदरांमधून ही मालवाहतूक करण्यात आली आहे. यामध्ये दीनदयाळ बंदर (पूर्व कांडला), मुंबई, जवाहर लाल नेहरु पोर्ट, मर्मगोआ, न्यू मेंगलोर, कोच्ची, चेन्नई, कामराजार(पूर्व एन्नोर), वी.ओ.चिंदबणार, विशाखापट्टणम, पारादीप आणि कोलकाता (हल्दियासह). आदी बंदाराचा समावेश असल्याची माहिती दिली आहे.









