सेन्सेक्स 996 अंकांनी वधारला : ऍक्सिस बँक नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई शेअर बाजारातील दुसऱया सत्रात बुधवारी बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांच्या विक्रीमुळे तेजीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले. दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 995.92 अंकांनी वधारुन निर्देशांक 31,605.22 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 285.90 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,314.95 वर बंद झाला.
सुरूवात शेअर बाजाराची थोडी सावधच झाली. मग मात्र दुसऱया सत्रात सेन्सेक्समधील बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाली. परिणामी भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले.
दिग्गज कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक 13 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. सोबत आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्सच्या समभागांची चमकदार कामगिरी राहिली होती. याच्याविरुद्ध मात्र सन फार्मा, टेक सिमेंट, टायटन आणि एशियन पेन्ट्स यांच्या समभागांमध्ये घसरणीचे सत्र राहिले. दुपारी शेअर बाजाराने आपला मूड बदलला. सेन्सेक्स व निफ्टीने तेजीकडे वाटचाल सुरू ठेवली.
कोविड19 च्या वाढत्या संसर्गामुळे बाजारामधील व्यवहार करणाऱया भागीदारांमध्ये चिंता राहिली होती. कारण भागीदारांनी मे महिन्यातील वायदा आणि अन्य पर्यायासोबतचा व्यवहार केल्याचे दिसून आल्याने समभाग खरेदी वधारली होती, असे शेअर बाजारातील तज्ञांनी म्हटले आहे.
विदेशी बाजारांमधील सकारात्मक कामगिरीमुळे व्यवहारांमध्ये उत्साहाचे वातारण राहिल्याचा लाभ गुंतवणूकादारांना घेता आला.
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी मंगळवारी 4,716.13 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. बुधवारी टोकिओ आणि सिओलमधील शेअर बाजार नफ्यात राहिले होते.








