वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020 हे नवीन वर्ष बुधवारपासून सुरु झाले आहे. यामध्ये विविध क्षेत्रात नवनवीन बदल करण्यात आले आहेत. त्यात आर्थिक क्षेत्रांशी संबंधीत बँकिंग, विमा, जीएसटी आणि वाहन क्षेत्राशी संबंधीत नवीन नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू करण्यात आले आहेत. त्यांचा तपशील पुढील प्रमाणे.
स्वस्त होणार कर्ज
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) रेपोदराशी संबंधीत असणाऱया कर्जांच्या दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. ही कपात 1 जानेवारी 2020पासून सुरु केली आहे.
एटीएम व्यवहारासाठी ओटीपी
एसबीआयकडून 1 जानेवारीपासून एटीएमवरुन रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत एटीएममधून रोकड काढण्यासाठी ओटीपीची सुविधा लागू करण्यात आली आहे. परंतु ही सुविधा फक्त एसबीआय ग्राहकांसाठी लागू करण्यात केली आहे.
एनइएफटी व्यवहार मोफत
1 जानेवारीपासून नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनइएफटी) करण्यासाठीचा संपूर्ण व्यवहार विनाशुल्क करण्यात येणार आला आहे. रुपे कार्ड आणि युपीआयच्या मदतीने डिजिटल पेमेन्ट केल्यास कोणत्याही प्रकारचा एमडीआर शुल्क लागणार नाही.
जेष्ठ नागरिकांसाठी सेव्हींग योजनेस लॉक इन पीरियड
केंद्र सरकारकडून 1 जानेवारीपासून जेष्ठ नागरिकांसाठी सेव्हींग योजनेसाठी लॉक इन पीरियड अनिवार्य केले आहे. या योजनेमधून पाच वर्षांपूर्वी ठेवलेली रक्कम काढता येणार नाही. जुन्या गुंतवणुकीवर हा नियम लागू होणार नाही.
वाहने महागणार
बीएस-6 प्रणाली आणि कच्च्या मालाच्या किमती यांच्या तेजी आल्यामुळे 1 जानेवारीपासून वाहने महागणार आहेत. उदाः मारुती, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, फेर्ड इंडिया, टोयोटा आदी कंपन्यांची दरवाढीची घोषणा.
आधारला होणार जीएसटी नोंदणी
सरकार व्यापाऱयांना आधार नंबरची जीएसटी नेंदणी करण्याची सुविधा देणार आहे. यामध्ये नोंदणी पद्धती अगदी सोपी असून सोबत जीएसटी परतावा फाईलची नवीन योजना उपलब्ध होणार आहे.
समाप्त होणार सवलत योजना
करासंबंधी वादविवाद टाळण्यासाठी केंद्राने सुरु केलेली सबका विश्वास ही योजना 31 डिसेंबर2019समाप्त होणार आहे. 1 जानेवारी 2020 पासून या योजनेमधून कोणताही लाभ मिळणार नाही.
ईपीएफओमध्ये कम्यूटेशनची सुविधा
1 जानेवारी पासून कर्मचारी पेंशन योजनेच्या अंतर्गत पेंशन कोषामधून कम्युटेशनची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. म्हणून ईपीएफओने यांची घोषणा केली आहे.








