वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील बँकांची क्रेडीट वृद्धी आतापर्यंत सर्वात नीच्चांकी पातळीवर गेली आहे. एप्रिल 2020 मध्ये ही वृद्धी 5.26 टक्क्मयांवर आली आहे. या अगोदर 1994 मध्ये बँक पेडिट वृद्धी 6 टक्क्मयांवर राहिली होती. जानेवारी 2020 मध्ये हा दर 8.5 टक्के होता. बँक पेडिट वृद्धी मागील वर्षात 10.4 टक्क्मयांनी वधारली होती. जी चालू वर्षात सलग घसरत आहे.
बँकांच्या क्रेडीट वृद्धी घसरणीमुळे मुख्य रुपात सर्व्हिस क्षेत्रावर परिणाम झाला आहे. या क्षेत्रात कर्जाच्या वृद्धीदरात मोठी घसरण झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये सर्व्हिस क्षेत्रात कर्ज वृद्धी दर 8.9 टक्के होता. जो जानेवारी 2019 मध्ये 23.9 टक्क्मयांवर राहिला आहे. दुसऱया बाजूला बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा कर्ज वृद्धी दर घटून 32.2 टक्क्मयांवर आला आहे. जो एक वर्षाच्या अगोदर समान महिन्यात पाहता 48.3 टक्के राहिल्याची नोंद करण्यात आला आहे.









