वृतसंस्था/ नवी दिल्ली
जपानमधील सॉफ्टबँक येत्या काळात फ्लिपकार्टमध्ये 50 ते 60 कोटी डॉलर्स गुंतवण्याच्या दृष्टीने विचार करत असल्याचे समजते. यासंबंधीची बोलणी दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक स्वरूपात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ही अमेरिकेतील वॉलमार्ट यांच्या मालकीची आहे. सॉफ्टबँक तीन वर्षामागे फ्लिपकार्टमधील समभाग विकून बाहेर पडली होती. सध्या फ्लिपकार्ट अनेक जणांशी गुंतवणुकीबाबत बोलणी करत असल्याचे समजते. यात सॉफ्टबँकेचाही समावेश आहे. सॉफ्टबँक फ्लिपकार्टमध्ये 50 ते 60 कोटी डॉलर्स गुंतवण्याचा विचार करते आहे. भारतीय रुपयात विचार करता ही गुंतवणूक 4 हजार 382 कोटी रुपयांत मोजली जाईल. सदरच्या गुंतवणूकीच्या व्यवहाराबाबत सॉफ्टबँकेने स्पष्टता करण्यास नकार दिला आहे.









