सस्तासुंदर मार्केटप्लेसचे केले अधिग्रहण
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इ-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी फ्लिपकार्ट आता औषध क्षेत्रात उतरणार आहे. आरोग्य क्षेत्रात उतरून लोकांना घरपोच औषधांचा पुरवठा फ्लिपकार्ट करणार आहे. कोलकाता येथील कंपनी सस्तासुंदर मार्केटप्लेसचे नुकतेच फ्लिपकार्टने अधिग्रहण केले आहे.
सस्तासुंदरचा विस्तार
सस्तासुंदर डॉट कॉमने याआधीच 490 फार्मसी कंपन्यांशी भागीदारी केली आहे. यामध्ये जपानमधील कंपनी मित्सुबिशी आणि रोहतो फार्मास्युटिकल या ंकंपन्यांची गुंतवणूक आहे. फ्लिपकार्ट आपल्या हेल्थ प्लस सर्व्हिस याअंतर्गत भारतीय ग्राहकांना औषधे सवलतीच्या दरात उपलब्ध करणार आहे.
स्पर्धा वाढली
फ्लिपकार्टने आता फार्मसी क्षेत्रात एंट्री केली असली तरी याआधी इतर कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश मिळवला आहे. ऍमेझॉन यांनी यावर्षीच्या सुरूवातीलाच औषधांचा घरपोच पुरवठा करण्याला सुरूवात केली आहे. बेंगळूरात ही सेवा सुरू केली होती. याशिवाय टाटानेही ऑनलाइन फार्मसी 1 एमजी खरेदी केली असून ऑनलाइन फार्मसी क्षेत्रातील स्पर्धेत फ्लिपकार्ट इतरांना टक्कर देण्यासाठी प्रयत्न करेल, हे नक्की.









