स्लमडॉग मिलेनियरमधील अभिनेत्री
हॉलिवूड चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनियर’मुळे प्रसिद्ध अभिनेत्री फ्रीडा पिंटोने मुलाला जन्म दिला आहे. फ्रीडाने सोमवारी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवर मुलाचे छायाचित्र शेअर केले आहे. तिने मुलाचे नाव रुमी-रे ठेवले आहे. फ्रीडाने याचबरोबर पती कॉरी ट्रानचे छायाचित्रही शेअर केले ओ.

फ्रीडाने पती कॉरीच्या जन्मदिनी छायाचित्रे शेअर केली आहेत. माझे पती, मित्र, जीवनाचा जोडीदार मी तुझा जन्मदिन साजरा करते. तू केवळ पिता नव्हे तर सुपर-डॅड ठरल्याने मला आनंद होतोय. झोपेसाठी अस्वस्थ आईला यामुळे आराम मिळतो असे फ्रीडाने नमूद पेले आहे.
कॉरीने देखील इन्स्टाग्रामवर ही छायाचित्रे शेअर जन्मदिनाची सर्वात चांगली भेट मिळाल्याचे म्हटले आहे. रुमी-रेला जन्म देताना तुला पाहणे खरोखरच चमत्कार होता, तू एक योद्धा आहेस असेही कॉरीने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. फ्रीडा आणि कॉरीने मागील वर्षी कोरोना महामारीदरम्यान विवाह केला होता. त्यांनी विवाहाबद्दल अत्यंत गुप्तता बाळगली होती.









