फ्रान्समध्ये स्थिती वेगाने बिघडत असल्याचे आता तेथील सरकारनेही मान्य केले आहे. दिवसभरात तेथे 20 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. देशात संसर्गाची दुसरी लाट अत्यंत वेगाने फैलावत असल्याचे नॅशनल हेल्थ ऑर्गनायजेशनने म्हटले आहे. निर्बंधांचे पालन करणाऱयांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे सरकारने आता स्पष्ट केले आहे. काही लोकांमुळे इतरांचा तसेच मोठय़ा समुदायाचे जीवन धोक्यात टाकू शकत नाही. अवघड काळ असून नियमांचे योग्यप्रकारे पालन करावे लागणार आहे लोकांनी निर्बंध आणि विषाणूसोबत राहणे शिकावे असे आवाहन आहे. अधिक खबरदारी बाळगल्यास संक्रमण लवकर रोखता येणार असल्याचे आरोग्यमंत्री ओलिवर वेरन यांनी म्हटले आहे.
Previous Articleकोरोना, हिवाळा प्रदूषणाचा तिहेरी मारा
Next Article जगभरातील 2.90 कोटी महिला आधुनिक गुलामगिरीच्या शिकार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









