गुजरात व तामिळनाडूमधील प्रकल्पांचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतातून काढता पाय घेणार असल्याची घोषणा केलेल्या फोर्ड मोर्ट्सच्या गुजरात व तामिळनाडूमधील केंद्रांवर टाटा मोटर्सची नजर असल्याची बाब समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये सध्याला प्राथमिक स्तरावरची चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येते. टाटा मोर्ट्स खरेदी व्यवहार करण्यामध्ये यशस्वी ठरल्यास ही फोर्डच्या असेट्सची दुसरी खरेदी असणार आहे. कंपनीने या अगोदर मार्च 2008 मध्ये फोर्डच्या जॅग्वार लँड रोव्हरची खरेदी केली होती. टाटाने याकरीता अमेरिकन पंपनीला देण्यासाठी 2.3 अब्ज डॉलर मोजले होते.
तीन प्रवासी वाहन उत्पादन प्रकल्प
टाटा मोर्ट्स इको प्रेंडली गाडय़ांची निर्मिती करण्याच्या कामात गती वाढवत आहे. फोर्डचे गुजरात व तामिळनाडूमधील उत्पादन कारखाने खरेदी केल्यास उत्पादन क्षमता अधिकची वाढणार आहे. साधारणपणे देशात टाटा मोर्ट्सचे तीन प्रवासी वाहन उत्पादनांचे प्रकल्प आहेत.
इलेक्ट्रिक आणि ऑटोमेटेड वाहनांसाठी अधिकची गुंतवणूक एकदा का व्यवहार झाला की भारतामधून फोर्डची सुटका होणार आहे. तर इलेक्ट्रिक आणि ऑटोमेटेड वाहनांमध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या दिशेने कंपनी प्रयत्न करणार आहे. टाटाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन व कार्यकारी संचालक वाघ यांनी तामिळनाडूमधील अधिकाऱयांसोबत चर्चा केल्यानंतर टाटा फोर्डचे प्रकल्प घेणार असल्याच्या शक्यता दृढ झाल्या आहेत.









