अन्नधान्याच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंतच्या प्रवासामध्ये शेतमालाची हाताळणी होत असते. यामध्ये अनेक प्रकारची प्रक्रिया, पॅकिंग, घाऊक व्यवहार, किरकोळ व्यवहार यांचा समावेश असतो. शेती क्षेत्रातील रोजगाराच्या (42.39टक्के) किती तरी पटीने शेतमालाच्या पणन व पणन पश्चात व्यवहारामध्ये रोजगार निर्मिती होत असते. बिगर कृषीक्षेत्रामध्ये आणि कृषीक्षेत्राच्या आदाने, कार्यशाळा, कृषी अवजारे, बियाणे आणि किटकनाशके या क्षेत्रामध्ये तितकाच रोजगार निर्माण झालेला असतो. या क्षेत्राचे आदान प्रदान (इनपूट आउटपूट ऍनालिस) विश्लेषक 21 क्षेत्राशी संबंधित आहे. यामुळे अर्थव्यवस्थेतील साखळी अनेक व्यवहाराशी निगडित असते. एका टक्क्मयानी कृषी विकास घटला की त्याचा परिणाम दोन टक्क्मयांनी उद्योगावर आणि अर्धा टक्क्मयांनी सेवा क्षेत्रावर होत असतो. त्यामुळे ग्राहक शेतकरी जशी साखळी असते, तशीच शेतकरी-उद्योजक साखळी प्रस्थापित झालेली असते.
फोर्क टू फार्म म्हणजे शेतमालाचा पुरवठा थेट ग्राहकांच्या डायंिनग टेबलपर्यंत पोहोचविणे असा होतो किंवा ग्राहकांच्या दैनंदिन गरजा शेतकऱयांमार्फत कसे पुरवता येईल या प्रक्रियेचा समावेश अभिप्रेत असतो. ग्राहकांच्या आवडी-निवडी, त्यांचे आरोग्य आणि शेती उत्पादन व पर्यावरण यांचा सहसंबंध यामुळे प्रस्थापित होतो. एवढेच नव्हे तर ग्राहकांनी योग्य व सकस आहार कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शनाची खूप गरज असते. विविध डायट्रीचे मेनू पुरविणे अथवा त्यासंबंधीची माहिती देणे आणि त्याची पूर्तता करणे या प्रक्रिया फोर्क टू फार्म या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतात.
जीवनचक्र विवेचनाचा दृष्टिकोनाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येत की, अन्न उत्पादनामध्ये पर्यायवरणीय परिणामांचा प्रभाव आढळून येतो. त्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेसंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. अन्न असुरक्षितता निर्माण होतेच. शिवाय सुरक्षित अन्न व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे येतात. या प्रक्रियेमध्ये अन्नधान्य, फळे, भाज्या, आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनाची प्रक्रिया आणि पद्धती या बाबी समजून घेतल्या पाहिजेत. तसेच त्यांची वाहतूक, पॅकिंग आणि त्यांची नासाडी याबाबीदेखील महत्त्वाच्या आहेत. या शेतमालाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये अधिक कीटनाशके फवारणे, हरितवायूंच्या प्रभावाने त्याची गुणवत्ता कमी होणे, मृद आरोग्य बिघडणे, पाण्याची गुणवत्ता बाधित होणे, योग्य पद्धतीने शेतमालाची हाताळणी न करणे यासारख्या बाबीमुळे असुरक्षित अन्न व्यवस्था निर्माण होते. अशा पद्धतीची असुरक्षितता निर्यातीला घातक असते. तसेच देशांतर्गत उपभोगातील त्याच्या सहभागामुळे लोकांचे आरोग्य बिघडते आणि लाईफ सायकल बदलून जाते. त्यासाठी एफ.ए.ओ. ची फूड बॅलन्स शीट मार्गदर्शिका खूप उपयुक्त ठरते. फोर्क टु फार्म प्रक्रियेमध्ये हे बॅलन्स शीट शेतकऱयांनी अभ्यासणे आवश्यक बनते.
शेतमालाच्या उत्पादनापूर्वी आपल्या जमिनीचे अनारोग्य सुधारणे, हवामानाचा आणि हंगामाच्या अनुषंगाने कोणत्या पिकांची लागवड करावी हे निश्चित करावे लागते. त्यासाठी प्रत्येक हंगामामध्ये ग्राहकांच्या डायट्रीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. उच्च व मध्यम वर्गीयांची निवड, त्यांच्याकडील उपभोग्य खर्चाची, प्रवृत्ती आणि मागणी तपासून त्या गुणवत्तेच्या शेतमालाची निर्मिती यंत्रणा निर्धारित करावी लागते. अन्नाचे सत्व, गुणधर्म आणि गुणवत्ता निर्धारित करून सुरक्षित अन्न उत्पादन करावे लागते. म्हणूनच सेंद्रिय शेती पद्धती लोकप्रिय होत आहे. न्यूट्रि फार्मिंग, फोर्क टू फार्म, न्युट्रसिटिकल उत्पादने स्वीकारून त्यांच्या उत्पादनाची पद्धती आदर्शवत करावी लागते. जसे दिवाळी, दसरा, बकरी इद, रमझान, ख्ा्रिसमस, व्हेलेंटाईन डेच्या प्रसंगानुरुप आपण विविध उत्पादने बाजारपेठेत आणतो. त्या पद्धतीने प्रत्येक आठवडा, महिना, हंगाम व हवामानानुरुप शेतमालाचे उत्पादन ग्राहकांच्या डायनिंग टेबलच्या मागणीनुसार त्यांचे उत्पादन करणे अधिक चांगले असते. विशेषत:
ऍग्री टुरिझमचा प्रयोग हंगामानुरुप केला जावा. न्युट्रसिटिकल, कृषी उत्पादने मानवी आरोग्याच्या समस्येप्रमाणे निर्धारित करावीत. कौटुंबिक आरोग्याची स्थिती आणि आरोग्याची काळजी, त्यांचे हंगामानुसार उपभोग प्रवृत्ती लक्षात घेऊन, कृषी मालाच्या उत्पादनाचे नियोजन करावे. ढोबळ बाजाराचे स्वरुप लक्षात घेऊन कृषी मालाच्या निर्मितीचे नियोजन शेतकरी करतो. पण त्याला शास्त्रीय संदर्भ आणि आधार दिल्यास व्यावसायिक कृषी संघटन होऊ शकते.
शाश्वत अन्न सुरक्षिततेची साखळी निर्माण करण्यासाठी काही पथ्ये शेतकऱयाला पाळावी लागतील. सरधोपटपणे शेती करता येणार नाही. सध्याची कौटुंबिक डायट्री लक्षात घेऊन कोणत्या धर्तीची डायट्रीची गरज आहे, याचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. देशभरातील ग्राहकांचा अभ्यास उपयोगी ठरतो. कृषी मालाच्या विपणन क्षमतेचा विस्तार त्यामुळे प्रभावित होतो. तसेच निर्यातीची दिशा (देश) निश्चित करता येते. शेताच्या बांधावर खरेदी करणारा स्थानिक ग्राहक असतो. राज्यांतर्गत व्यापारासाठी पॅकिंग व वाहतूक साधने निश्चित करावी लागतात. निर्यातीसाठी प्रत्येक देशाला वेगवेगळय़ा पद्धतीची पॅकिंग पद्धती हाताळून सुरक्षित अन्न साखळी निर्माण करावी लागते.
शेतकऱयाला ऍग्रीप्रन्युअर झाल्याशिवाय त्याला ऍग्रीबिझनेस करता येणार नाही. ऍग्रीप्रन्युअरकडे प्रत्येक भागातील आणि देशातील ग्राहकांच्या माहितीची आकडेवारी, त्यांचे आरोग्य, उत्पन्न पातळी आणि त्यांची न्युट्रसिटिक उत्पादनाला असणारी मागणी निश्चितपणे समजून त्याचा डेटाबेस तयार केला पाहिजे. काही वेळा एखाद्या उत्पादनाची माहिती सेमिनार बेबीनारद्वारा माहीत करून देणे आवश्यक असते. विन सिंचन सुविधाने ज्वारी, गहू, कडधान्ये पिकविलेल्या कृषी मालाला मागणी अधिक असू शकते. पण त्यासंबंधीची कल्पना ग्राहकांना दिल्यास त्याला अधिक मागणी येऊ शकते. अशा शेतमालाच्या किमती दुप्पट, दीडपट ठेवता येईल, पण त्यासाठी जाहिरात महत्त्वाची असते. काही वेळा योग्य सकस आहाराची माहिती ग्राहकांना द्यावी लागते. काहीवेळा प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थाला खूप मागणी असू शकते. प्रक्रिया केलेली असल्यामुळे त्या पदार्थाचे आयुष्य वाढते आणि शेतकऱयांची सौदा शक्तीदेखील वाढते. मल्टी क्रायटेरिया मॅपर पद्धतीने ग्राहकांच्या मुलाखती, आवडी निवडी, लक्षात घेऊन शाश्वत डायट्री सुचविता येते. त्या धर्तीवर न्युट्रॉसिटिकल कृषी उत्पादने निर्माण करता येतात. त्यासाठी डोळस सरकारी धोरण अस्तित्वात असावे लागते. सरकार चालविणारे ऍग्रीप्रन्युअर नसतात, पण त्यांना तसे प्रवृत्त केल्यास सरकारच्या दृष्टीकोनामध्ये आधुनिकता आणता येते, जसे उद्योजक सरकारवर प्रभाव टाकून अत्यल्प उद्योगधंद्याविषयी अनुकूल धोरण आखून घेतात, तसे शेतकऱयांनी सवलती, सबसिडी, कर्जमाफी, आधार किंमती या मागे न लागता योग्य शाश्वत कृषी व्यवहार आणि कृषी व्यापारासाठी आवश्यक ती धोरणे आखून घ्यावेत, यामध्ये शेतकऱयाचा आधुनिक दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो.
डॉ. वसंतराव जुगळे