मास्को
फायझरची लस घेतलेल्या 12 ते 15 वर्षाच्या मुलांना अल्प दुष्परिणाम दिसून आले असल्याचे संशोधकांच्या एका अभ्यासात दिसून आले आहे. दुष्परिणाम दिसलेल्या मुलांची संख्या तुलनेने कमी असल्याचे संशोधकांनी अभ्यासात नमूद केले आहे. सध्याला इंग्लंडमध्ये फायझरची लस 12 ते 15 वर्षाच्या मुला-मुलींना दिली जात आहे. यादरम्यान केलेल्या पाहणीदरम्यानच्या अभ्यासात काही मुलांवर लसीचा अल्पसा दुष्परिणाम दिसून आला आहे.

इंग्लंडमधील ब्रिस्टॉल रॉयल हॉस्पिटलच्या संशोधकांनी यासंबंधीचा अभ्यास नुकताच केला आहे. त्यांनी 27 मुलांच्या पालकांना विचारलं असता त्यांनी मुलांवर अल्पसे दुष्परिणाम दिसल्याचे म्हटले आहे. चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे असा परिणाम लस घेतलेल्या मुलांवर दिसून आला आहे.









