प्रतिनिधी / फलटण :
फलटणमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आता ताण येऊ लागला आहे. फलटणमध्ये रुग्णांना बेड्स मिळणे कठीण झाले आहे. या प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्यासाठी फलटणकरांच्या मदतीला उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे धावून आले आहेत. भोईट यांनी यांच्या सजाई गार्डन मंगल कार्यालयात स्वखर्चाने 100 बेड्सचे कोरोना केअर सेंटर उभारून प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सजाई गार्डन मंगल कार्यालयात उभारण्यात येत असलेल्या कोरोना केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे आदी उपस्थित होते.