प्रतिनिधी / फलटण :
फलटणमधील शिवाजीनगर येथे एका बोळात नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. या अर्भकावर सातारा येथील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असून, अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास शिवीजी नगर फलटण येथे सफाई कामगार कॉलनीत मुकेश अहिवळे यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीलगत अंदाजे 3 फुटाच्या बोळीत एका छोटया खड्डयात नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.









