ऑनलाईन टीम / पुणे :
सुदृढ आणि सक्षम लोकशाहीसाठी मी माझा मतदानाचा पवित्र हक्क बजाविन आणि भ्रष्टाचारमुक्त, गतीमान सुशासनासाठी इतरांनी मतदान करावे यासाठी जनजागृती करीन अशी सामूहिक शपथ डीईएसच्या फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली.
दहाव्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ‘मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेतील विजेत्या देवयानी महाजन, अनुष्का शेलार, मल्हार सातव या विद्यार्थ्यांना उपप्राचार्य नारायण कुलकर्णी आणि पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. प्राचार्य डॉ. रवींद्रसिह परदेशी व अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









