मुंबई \ ऑनलाईन टीम
सध्या महाराष्ट्रातील राजकारण रेमडेसिविरच्या साठेबाजीवरून चांगलेच तापले आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन तुटवड्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या रेमडेसिविर साठा प्रकरण सेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या ऑक्सिजनची मागणी कमी करा या वक्तव्याचा चांगलाच समचार घेतला.
माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. रेमडेसिवीरचा साठा राज्याला मिळावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे. परंतु तो भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठिशी घालणं योग्य नव्हतं. ही कंपनी गुजरातमध्ये काळाबाजार करताना पकडली गेली आहे. फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी सरकारला, पर्यायाने जनतेला मदत करण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. ते दिल्लीला जाऊन बसले तर मदत करु शकतात पण दुर्दैवाने ते पोलीस स्थानकात जाऊन बसतात. महाराष्ट्राला इंजेक्शन देऊच नये असा आदेश काढतात ये योग्य नाही. महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळू नये हे चुकीचं आणि निषेधार्ह असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ऑक्सिजनची मागणी कमी करा,असं वक्तव्य केले होते. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या या वक्तव्याचा बाळासाहेब थोरात यांनी यावेळी समाचार घेतला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, मागणी कमी करा म्हणजे काय?, ऑक्सिजनची गरज आहे हे गोयल समजू शकले नाहीत. ते महाराष्ट्राचं प्रतिनिधी करतात. रेल्वे तुमच्याकडे आहे, त्याचा उपयोग करुन या मातीचे ऋण कसे फेडता येईल ते पाहावं.
तसेच सरकार जनतेसाठी निर्णय घेत आहे त्यामुळे जनतेने उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन पाळला पाहिजे असे देखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
Previous Articleगोकुळ निवडणूक प्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
Next Article कोरोना योध्यांचे विमा कवच बंद








