वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
म्युच्युअल फंड हाऊसेस यांच्याकडून फेब्रुवारी महिन्यात लार्जकॅपमधील सिप्लाचे 10,888 कोटी रुपयाच्या समभागांची खरेदी तर इंडसइंड बँकेच्या 7,585 कोटी रुपयांच्या समभागांची या दरम्यान खरेदी करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार लार्जकॅपमधील सिप्लानंतर सर्वाधिक खरेदी एचडीएफसी लाईफच्या समभागांची राहिली आहे. यांचे 5,434 कोटींचे समभाग खरेदी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मदरसन सूमी 5,135 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. फंड हाऊसेसकडून याचदरम्यान डीएलएफच्या 2,605 कोटी, गोदरेज कंझ्युमरच्या 2,450 आणि युपीएलच्या 2,863 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करण्यात आली आहे.

फंड हाऊसेसने स्मॉलकॅपमधील इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेनंतर 956 आणि बार्बीक्यूचे 500 कोटीच्या समभागांची खरेदी केली आहे. यासोबत अमारा राजा आणि ग्रेन्यूएल्सचे सर्वाधिक जादा मूल्य समभाग विकले गेले आहेत. यासोबतच फंड हाऊसने प्रेस्टिज एस्टेट, भारत फोर्जच्या समभागांची खरेदी केली. निप्पॉन म्युच्युअल फंडने फायझरवर 297 कोटी रुपयांचा दावा केला आहे. आदित्य बिर्ला, सन लाईफने कमिन्स इंडियाचे 291, झी एंटरटेनमेन्ट 270, डिव्हीस लॅब्स आणि टीव्हीएस मोटर्सचे 288 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत.
लार्जकॅपमधील 7,387 कोटी रुपयांच्या समभागाची खरेदी भारत पेट्रोलियमने केली आहे. यापाठोपाठ, अपोलो हॉस्पिटल, टाटा पॉवर आणि झोमॅटो आदींची समभाग खरेदी करण्यात आली आहे.









