वृत्तसंस्था/ प्राग
आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटू झेकची कॅरोलिना प्लिसकोव्हाने 2021 च्या टेनिस हंगामासाठी नव्या प्रशिक्षकाबरोबर करार केला आहे. जर्मनीचे 36 वर्षीय सॅचे बेजिन हे प्लिसकोव्हाचे नवे प्रशिक्षक म्हणून राहतील.
जर्मनीचे बेजिन हे यापूर्वी जपानच्या नाओमी ओसाकाचे प्रशिक्षक म्हणू
न कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओसाकाने 2018 साली अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम तर 2019 साली ऑस्टेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. काही कालावधीसाठी बेजिन यांनी अमेरिकेच्या सेरेना विलीयम्सला मार्गदर्शन केले होते. प्लिसकोव्हाने आपल्या फेसबुकवर आणि ट्विटरवर बेजिनसमवेत आपले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. 28 वर्षीय प्लिसकोव्हाने ब्रिस्बेनमधील टेनिस स्पर्धा यावर्षी जिंकली होती.









