नवोदित वेलिंग प्रियोळ संस्थेचा खुलासा
प्रतिनिधी / फोंडा
प्रियोळ ग्रामपंचायत क्षेत्रात रेशनधारकांना नवोदित वेलिंग प्रियोळ विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून जो धान्यपुरवठा वितरीत होत आहे, तो सर्व रेशनधारकांना मोफत नसून केवळ एएव्हाय आणि पीएचएचसाठी आहे. रेशनधारकांनी त्याबाबत गैरसमज करुन घेऊ नये. कुणीही त्याचा आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी गैरप्रचार करीत असल्यास ते चुकीचे व जनतेची दिशाभूल करणारे आहे, असा खुलासा संस्थेच्या संचालक मंडळाने केला आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात प्रियोळ पंचायत क्षेत्रातील नागरिकांना स्वस्त दरात कडधान्ये वितरीत केली जात असल्याचे म्हटले होते. या वृत्तातील माहिती चुकीची आहे. ज्यामुळे रेशनकार्ड धारकांमध्ये गैरसमज पसरला आहे. केवळ एएव्हाय आणि पीएचएच या गटात येणाऱया रेशनकार्ड धारकांनाच तांदूळ मोफत मिळणार आहेत, असे संस्थेच्या संचालक मंडळाने एका प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे. संचालक मंडळाचे अध्यक्ष मंगलदास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर हे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.









