5 जानेवारीला सकाळी 6.30 वाजता रवींद्र नाटय़मंदिर येथे कार्यक्रम
मुंबई / प्रतिनिधी
पंचम निषादतर्फे प्रात:स्वर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. आज, रविवारी सकाळी 6.30 वाजता कलांगण, रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या प्रात:स्वर कार्यक्रमात गायिका मीता पंडित यांचे स्वर गुंजणार आहेत. हा 108 वा प्रात:स्वर कार्यक्रम आहे.
विश्वनाथ शिरोडकर (तबला), सीमा शिरोडकर (संवादिनी) आणि दिलशाद खान (सारंगी) मीता पंडित यांना साथ देणार आहेत. Eिदुस्थानी शास्त्राrय संगीतामधील त्या आघाडीच्या गायिका आहेत. भारतभर आणि जवळपास 25 देशांमध्ये त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. सुफी, ठुमरी, भक्तीगीते ही मीता पंडित यांची वैशिष्टय़े आहेत. मीता पंडित या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका आहेत. पं. कृष्णराव शंकर पंडित यांच्या त्या नात आहेत तर पं. लक्ष्मण कृष्णराव पंडित हे त्यांचे वडिल आहेत. त्यांच्या घरातून शास्त्राrय गायनाचे कार्यक्रम सादर करणाऱया त्या पहिल्या महिला आहेत. सवाई गंधर्व महोत्सव, पं. दिनानाथ मंगेशकर महोत्सव, ठाणे फेस्टिव्हल, सप्तक, डोव्हरलेन म्युझिक कॉन्फरन्स, हरबल्लभ संगीत समारोह, तानसेन महोत्सव, भक्ती संगीत, जयपुर साहित्य महोत्सव, जश्न- ए – खुसरो, शंकरलाल संगीत महोत्सवांमध्ये मीता पंडित यांनी आपली छाप निर्माण केली आहे. तर परदेशात दरबार फेस्टिव्हल (लंडन), डब्लूओएमएडी फेस्टिव्हल (न्यूझीलंड), युरोपालिया इंडिया (ब्रुसेल्स), सार्क संगीत महोत्सव (इस्लामाबाद), रिटबर्ग (झुरिच), तास्मानियन इंटरनॅशनल आर्ट्स फेस्टिव्हल, वर्ल्ड म्युझिक इन्स्टिटय़ुट (न्यूयॉर्क) अशा प्रतिष्ठीत महोत्सवांमध्ये मीता पंडित यांनी सहभाग घेतला आहे. 2003 साली फ्रान्स सरकारने मीता पंडित यांना फ्रेंच कलाकारांना प्रशिक्षण देन्यासाठी आमंत्रित केले होते. 2005 साली प्रसार भारतीतर्फे मीता : लिंकिंग अ ट्रेडिशन विथ टुडे ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती. संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार, इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कार, युवा ओजस्विनी, सूर-मणी, दिल्ली रत्न, बिरजू महाराज परंपरा पुरस्कार, द गोल्डन व्हॉईस ऑफ इंडिया, भावेश्वर राष्ट्रीय सन्मान असे अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. मीता पंडित यांनी संगीतात पीएचडी केली आहे. इंडियाज हेरिटेज ऑफ घराणा म्युझिक : पंडित्स ऑफ ग्वालियर हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.