प्राणिक हीलिंग या उपचार पद्धतीबद्दल जाणून घेत असताना बऱयाच जणांना बरेच प्रश्न पडतात. बऱयाच जणांच्या आजूबाजूला प्राणिक हिलर सुद्धा असतील पण आपल्याला ते नेमके काय आणि कोणत्या आजारांवर उपचार करतात हे माहिती नसेल. आजच्या लेखात ही उपचार पद्धती कोणत्या आजारांवर काम करते ते पाहू.
प्राणिक हीलिंग पूरक उपचार पद्धतीची व्याप्ती ही फक्त शारीरिक आजारांपुरतीच मर्यादित नसून प्राणिक हीलिंग हे जीवनातील प्रत्येक समस्येवर आपल्याला मदत करते. प्राणिक हीलिंगचे वैशिष्टय़ म्हणजे प्राणिक उपचार आपले आपण (स्वतः स्वतःवर) सुद्धा घेऊ शकतो. आपल्या आयुष्यातील शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आपण स्वतःच स्वतःवर प्रभावी उपचार करू शकतो. एवढेच नव्हे तर रुग्ण व उपचारक प्राणिक हींलिंगमधील दूरस्थ उपचारांमार्फत रुग्णावर प्रभावी उपचार करू शकतो. दूरस्थ उपचारांमार्फत तुम्ही अगदी एका देशातून दुसऱया देशात असणाऱया रुग्णावर तितक्मयाच प्रभावीपणे उपचार करू शकता. सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, टाचदुखी इत्यादी व यासारख्या किरकोळ आजारांवर प्राणिक उपचार अत्यंत प्रभावी ठरतात. एवढेच नव्हे तर परीक्षांचा ताण, चिंता, मनात खोलवर बसलेली भीती, चंचलपणा, एकाग्रतेत अडथळा, चिडचिडेपणा यासारख्या भावनिक व मानसिक समस्या सोडवण्यात प्राणिक हीलिंग खूप फायदेशीर ठरते.
प्राणिक हीलिंग ही एक जीवनशैली आहे. अनेकदा आपल्याला अनुभव येतो की एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटते तर दुसऱया ठिकाणी आपल्याला अस्वस्थपणा जाणवतो. काही व्यक्ती खूप आनंदी असतात तर काही व्यक्ती खूप नकारात्मक विचार करणाऱया. ही अशी तफावत दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या किंवा त्या जागेच्या ऊर्जेची गुणवत्ता. हा ऊर्जास्तर व ऊर्जेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राणिक हीलिंग ही उपचार पद्धती आहे. स्वतःचाच नव्हे तर आपले घर, आपले नातेसंबंध, आपली आर्थिक स्थिती यांचा ऊर्जास्तर व ऊर्जेची गुणवत्ता सुधारून सर्वच स्तरांवर यशस्वी समाधानी जीवन जगण्याची गुरुकिल्ली प्राणिक हीलिंग आपल्याला देते.
प्राणिक हीलिंग ही आरोग्य संजीवनी आपल्यापैकी कुणीही सहज आत्मसात करू शकतो. प्राणिक हीलिंगचा प्राथमिक वर्ग शिकल्यास स्वतःवर उपचार करण्याची प्रभावी कला आपल्याला अवगत होते. आपल्या आयुष्यातील गरजांनुसार प्राणिक हीलिंगमध्ये अनेक वर्गांची रचना करण्यात आली आहे. प्राणिक हींलिंगच्या प्राथमिक वर्गात आपण ऊर्जाशरीर, चपे, प्राणिक हीलिंगचे सिद्धांत यांची माहिती करून घेतो. प्रत्येक चक्राचे काम, रोग झाल्यास त्यावर करायचे उपचार, तसेच ऊर्जेचा स्पर्श अनुभवणे, ऊर्जाशरीर व ऊर्जाचपे यांना स्पर्श करून त्यांचा अनुभव घेणे. ऊर्जा ग्रहण करून प्रक्षेपित करणे, स्वतःचा ऊर्जास्तर वाढवणे अशा अनेक गोष्टी आपण शिकतो. प्राणिक हीलिंगच्या दुसऱया स्तरात गंभीर आजारांवर अधिक प्रभावी उपचार करण्यासाठी काही प्रगत तंत्रपद्धती शिकवल्या जातात. तसेच काही विशिष्ट रंगाच्या प्राणशक्तीचा उपयोग रोग निवारणासाठी केला जातो. चक्रांची फिरण्याची गती, त्यांचा आकार नियंत्रित कसा करायचा हे शिकवले जाते. परिणामी कॅन्सर, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांवर प्रभावी उपचार शक्मय होतात. प्राणिक हीलिंगच्या पुढच्या स्तरात मनोवैज्ञानिक आणि मानसिक विकारांवर प्रभावी उपचार करण्याच्या उन्नत तंत्रपद्धती शिकवल्या जातात. नकारात्मक भावना, ताणतणाव, भीती, राग, नैराश्य यासारख्या आजारांवर विशेष उपचार करायला आपण शिकतो. एवढेच नव्हे तर नातेसंबंध सुधारणे, सकारात्मकता वाढवणे या गोष्टीही शिकवल्या जातात.
प्राणिक क्रिस्टल हीलिंगच्या वर्गात प्रभावी उपचारांसाठी क्रिस्टल म्हणजेच स्फटिकांचा वापर शिकवला जातो. प्राणिक हीलिंगमध्ये सगळेच स्तर शिकायला खूप सोपे असून व्यावहारिक दृष्टिकोनावर भर दिला जातो. म्हणजे शिकायला येणारी कोणतीही व्यक्ती या सगळय़ांवर फक्त शिकवणारा सांगतो किंवा सांगते आहे म्हणून विश्वास न ठेवता शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीची सत्यासत्यता आणि विश्वासार्हता प्रयोगाअंती पडताळून घेऊन मगच हे सर्व मनापासून समजून आणि पटवून घेते.
कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात होते आपल्या घरापासून, म्हणूनच आपले घर स्वच्छ व प्रसन्न असायला हवे. आपल्या घराची प्रसन्नता, यश हे अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यातील प्रमुख घटक म्हणजे दिशा. घरातील वस्तूंची रचना, आपली झोपण्याची दिशा इ. प्राणिक हीलिंग अनुसार प्रत्येक दिशेकडून येणाऱया ऊर्जेची गुणवत्ता व तिचे गुणधर्म वेगवेगळे असतात. आपली उद्दीष्टय़े साध्य करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेचा आपल्या घरातील स्तर कसा वाढवावा, नको असलेल्या ऊर्जेचे परावर्तन कसे करावे, घरात प्रसन्न व समाधानी वातावरण कसे निर्माण करावे, घरात सकारात्मक ऊर्जास्तर वाढवण्यासाठी घरातील वस्तूंची रचना कशाप्रकारे करावी यासारख्या गोष्टी ‘प्राणिक फेंगशुई’ या वर्गात शिकवल्या जातात.
व्यावसायिक तसेच आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी प्राणिक हीलिंगमध्ये ‘स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट’ हा एक उत्तम वर्ग आहे. आपली नोकरी अथवा व्यवसाय संपन्न कसा करावा, व्यवसायात महत्त्वाचे निर्णय कसे घ्यावे, विविध व्यक्तींची विशेषता लक्षात घेऊन त्यांच्याकडे विशिष्ट कामे कशी सोपवावीत अशा अनेक गोष्टींचा ऊर्जा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून हा वर्ग बनवण्यात आला आहे. प्राणिक हीलिंग या उपचारपद्धतीमध्ये विविध अभ्यासक्रम असलेले वर्ग शिकवले जातात. संपूर्ण जगभरात प्राणिक हीलिंग सेंटर आहेत जिथे या वर्गांचे प्रशिक्षण दिले जाते. सगळय़ा आजारांवर उपचार केले जातात. प्राणिक हीलिंग 16 वर्षांवरील लिहिता वाचता येणारी कोणतीही व्यक्ती शिकू शकते आणि प्राणिक हीलिंगचा कोणताही वर्ग हा 2 दिवसांचाच असतो. या दोन दिवसात तुम्ही हे तंत्र उत्तमपणे शिकून बाहेर पडता. हे तंत्र शिकल्यानंतर आपल्या जगण्याला एक वेगळेच वळण मिळते. आपले आयुष्य आपण आपल्याला हवे तसे घडवू शकतो. आपले ध्येय स्पष्टपणे आपल्याला कळते आणि त्याच्या पूर्णत्वाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो.








