वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया हैद्राबाद एफसी संघाचे प्रमुख प्रशिक्षक स्पेनचे 57 वर्षीय अल्बर्ट रोका यांनी आपले प्रशिक्षकपद सोडले असून आता ते बार्सिलोना एफसी संघात दाखल होणार आहेत.
गेल्या जूनमध्ये रोका यांनी हैद्राबाद एफसी फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची सूत्रे औपचारिकपणे हाती घेतली होती. पण त्यानंतर स्पॅनीश फुटबॉल क्षेत्रातील अव्वल समजल्या जाणाऱया बार्सिलोना क्लबने रोका यांना ऑफर दिली. बार्सिलोना आणि रोका यांच्यात दोन वर्षांचा करार झाल्याचे समजते.









