सातारा / गोडोली
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची निवड करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तर कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी अमुल्य योगदान देणाऱ्या सरपंचांना प्रशासक पदीवर नियुक्त करुन सन्मान वाढणार की शासकिय अधिकाऱ्यांना प्रशासक पदाची जबाबदारी पार पाडावी लागणार. याबाबत दाखल झालेल्या सर्व याचिकांवर दि.१४ ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.योग्य व्यक्ती की विद्यमान सरपंच की शासकिय अधिकारी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक कोण ..? याचा अंतिम फैसला लागणार असल्याचे गावापासून मंञालयापर्यंत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यातील तब्बल १४२३४ ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर अखेर संपत आहे. कोरोनाच्या धास्तीने निवडणूकाचं होणार नसल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने योग्य व्यक्तीची निवड प्रशासक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक संघटना कार्यकर्त्यांनी विद्यमान सरपंचाना पदोन्नती द्या, शासकीय अधिकारीच प्रशासक पदावर नियुक्त करावा. यासाठी न्यायालयात याचिका दाखल करुन शासनाच्या निर्णयाला आवाहन देत कोंडी केली आहे.
मुदत संपल्यानंतर योग्य व्यक्तीची निवड करण्याचा अधिकार पालकमंत्र्याच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देवून ग्रामविकास मंत्र्यानी आपला इरादा यशस्वी करुन दाखविण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. याबाबतचे नविन राजपत्र तयार करुन ‘योग्य व्यक्ती प्रशासक’ पदावर नियुक्ती करण्यासाठी न्यायालयातील आपली बाजू भक्कम केली आहे. मात्र सरपंच परिषद, काही संघटना आणि कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात अमूल्य योगदान देणाऱ्या सरपंचाना प्रशासक पदावर सन्मानाने नियुक्त करावे, यासाठी याचिका दाखल केली आहे. तर काही कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकारी कर्मचारी हेच प्रशासक पदावर नियुक्त केल्यावर जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील. या निर्णयासाठी याचिका दाखल केली आहे.
योग्य व्यक्ती, विद्यमान सरपंच की शासकीय अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त होणार याच्या राज्यभरातील याचिकांची सुनावणी उच्च न्यायालयात आज होणार आहे. प्रशासक कोण याचा फैसला न्यायालयात काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असून निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.
‘ऐतिहासिक निर्णय’
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अतिशय व्यस्त आहे. यामुळे त्यांना प्रशासक पदावर नियुक्ती न करता योग्य व्यक्तीची निवड करण्याचा प्रयत्न शासन करणार.जर शासकीय अधिकारी प्रशासक पदावर नियुक्ती करण्याची वेळ आली तर विस्तार अधिकारी (पंचायत,कृषी, शिक्षण,सांख्यिकी), पर्यवेक्षिका (अंगणवाडी, आरोग्य),शाखा अभियंता ( पाणी पुरवठा,बांधकाम, छोटे पाटबंधारे ), केंद्रप्रमुख,कृषी अधिकारी,कृषी सहाय्यक,मंडल अधिकारी (कृषी), वैद्यकीय अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांच्यावर जबाबदारी येण्याची शक्यता आहे. विद्यमान सरपंचाना पदोन्नती मिळाल्यानंतर कोणतीच अडचण येणार नाही. न्यायालयात तीन मतांत्तरावर होणारा एक निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









