दापोली/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या दापोली तालुक्यातील मुरुड येथे रिसोर्ट बांधल्याचा आरोप करून ते तोडण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मोठा प्रतीकात्मक हातोडा घेऊन पनवेल येथून सकाळी दापोलीकडे रवाना झाले आहेत. यामुळे दापोलीतील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर दापोलीत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांनी हा हातोडा जनतेच्या लोक भावनेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. त्यांना दापोलीतच अडवण्याची रणनीती दापोलीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी आखली आहे. त्यामुळे आता दापोलीत दुपारनंतर काय होते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.









