प्रतिनिधी/ बेळगाव
2014 बॅचच्या आयपीएस अधिकारी आणि बेळगावच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची बेंगळूर येथे बदली झाली आहे. बेंगळूर शहर गुन्हे विभागाच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक या पदावर त्यांना नेमण्यात आले आहे.
3 जुलै 2017 पासून बेळगाव पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून सीमा लाटकर काम पाहत होत्या. आता त्यांच्या पदावर कोणत्या नवीन अधिकाऱयाची नियुक्ती होणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवहार असलेल्या अधिकारी म्हणून सीमा लाटकर यांनी आपली ओळख निर्माण केली होती. अल्पकाळात लोकप्रिय अधिकारी म्हणून त्या गणल्या गेल्या.









