प्रतिनिधी/ मडगाव
आमच्याच राज्यात येऊन इब्राहीम मौलाना हे आम्हाला आज परप्रांतीय म्हणत आहे. त्यामुळे आज आपण त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार नोंद केलेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनाही पत्र लिहिण्यात आलेले आहे. माझा परिवार हा गोव्यात अनेक वर्षापासून स्थायिक आहे. परप्रांतीय राज्यातून येऊन माझ्या विरोधात अशा प्रकारे विधान करणे हे अत्यंत चुकीचे आहे असे एसजीपीडीएचे कंत्राटदार मिलाग्रीस फर्नांडिस यांनी म्हटले आहे. मडगावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इब्राहिम यांनी केलेले विधान तर संपूर्ण गोमंतकीयांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांच्या आत इब्राहिम यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. जर आठ दिवसांच्या आत कारवाई होत नसल्यास आपण रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा एसजीपीडीएचे कंत्राटदार मिलाग्रीस फर्नांडीस यांनी दिला.
गोमंतकीयांनी आता एकत्र येऊन परराज्यातील लोकांवर अशा प्रकारची विधाने करण्यापासून निषेध करण्याची गरज आहे. एसजीपीडीएचे अध्यक्ष विल्प्रेड डिसा हे एकमेव असे अध्यक्ष आहे, ज्यांनी आज पर्यंत इब्राहिम मौलाना यांना जवळ केलेले नाही. त्यामुळे घाऊक मासळी मार्केटमध्ये त्यांना हवे तसे वागायला मिळत नाही.
आपण घाऊक मासळी मार्केटमधून दिवसात दोन ते तीन लाख कमाई करत असल्याचे ते आमच्यावर आरोप करत आहे. तेव्हा त्यांनी आमच्यावर खोटे आरोप करण्याचे बंद करण्याची गरज आहे. जो पर्यंत आपण कंत्राटदार आहे, तोपर्यंत मौलाना यांना घाऊक मासळी मार्केटमध्ये वाईट कारनामे करु देणार नसल्याचे फर्नांडीस यांनी सांगितले.









