पोलीस रायझींग डे साजरा, उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिसांचा सन्मान
प्रतिनिधी/ पणजी
पोलिसांना चांगल्या साधनसुविधा मिळणे आवश्यक असते. चांगल्या साधन सुविधा मिळाल्यास पोलीसही चांगली कामगिरी बजावू शकतात असे पोलीस महासंचालक मुकेशकुमार मिणा यांनी सांगितले. पोलीस रायझींग डे कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारकडून पोलीस खात्याला चांगले सहकार्य मिळत असून वेळोवेळी चांगल्या साधन सुविधा पुरविल्या जात आहेत. येणाऱया काळातही पोलीस खात्यासाठी सरकारकडून अनेक चांगल्या गोष्टी होणार आहेत. मुख्य म्हणजे नवीन पोलीस मुख्यलय उभारण्यात येणार असल्याचेही पोलीस महासंचालकांनी सांगितले.
येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर काल रविवारी पोलीस रायझीं डे साजरा करण्यात आला त्यावेळी पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी वर्षाभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱयांचा डीजीपी मेडल देउन सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ठ पोलीस स्थानक म्हणून कुडचडे पोलीस स्थानकाने पहिला क्रमांक मिळविला आहे. त्यांना 30 हजार रुपये रोख रक्कम तसेच फिरता चषक प्रदान करण्यात आला. दुसऱया नंबर आलेल्या म्हापसा पोलिस्थानकाला 20 हजार रुपये व फिरता चषक देण्यात आला. तर तिसऱया नंबरवर आलेल्या वास्को पोलीस स्थानकाला 10 हजार रुपये व फिरता चषकावर समाधान मानावे लागले
28 पोलिसांना डीजीपी पदक
दरवर्षी पोलीस खात्यात पोलिसांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल त्यांना डीजीपी पदक देऊन सन्मानीत करण्यात येते. या वर्षी तब्बल 28 पोलिसांना डीजीपी पदकांसाठी निवड करण्यात आली होती त्यांना रायझींग डे दिवशी मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. त्यांत निरीक्षक विल्सन डिसोझा (कोंकण रेल्वे), निरीक्षक परेश नावेलकर (सुरक्षा विभाग), निरीक्षक विजय राणे सरदेसाई (आग्शी पोलीस स्थानक), निरीक्षक आनंद शिरोडकर (डीजीपी कार्यालय), निरीक्षक सोमनाथ माजीक (वाहतूक विभाग पणजी), निरीक्षक शाम धुरी (आयआरबी), निरीक्षक सुशांत जोशी (आयआरबी), नाईक दामोदर नाईक (आयआरबी), निरीक्षक सरोज दिवकर (आयआरबी), उपनिरीक्षक गोपाल घाडी (सीआयडी), उपनिरीक्षक देऊ माणगावकर (वाहतूक विभाग कोलवा), सहाय्यक उपनिरीक्षक उल्हास खोत (साळगाव पोलीस स्थानक), सहाय्यक उपनिरीक्षक रॉकी एस्ताबेरो (पीटीएस), सहाय्यक उपनिरीक्षक मकरंद पार्सेकर (एसपी उत्तर गोवा), सहाय्यक उपनिरीक्षक नरेश नाईक (वायरलेस विभाग), हवालदार सुभाष मालवणकर (कळंगुट पोलीस स्थानक), हवालदर सदानंद देसाई (शिवोली कोस्टल विभाग), हवालदार जितेंद्र फळदेसाई (वाहतूक विभाग कोलवा), महिला हवालदार स्नेहल फळदेसाई (एसपी दक्षिण गोवा), हवालदार सुरज पाटील (पीटीएस), हवालदार दामोदर मयेकर (कोकण रेल्वे), हवालदार मोहन नाईक (एमटी विभाग पणजी), हवालदार अमीत नाईक (पीटीएस) हवालदार सुधीर तळेकर (फातोर्डा पोलीस स्थानक), हवालदार इश्वर कासार (सीआयडी), कॉन्स्टेबल अनय नाईक (एएनसी), कॉन्स्टेबल पुरुषोत्तम नाईक (मडगाव पोलीस स्थानक), कॉन्स्टेबल लक्ष्मणकवठणकर (पणजी कोस्टल पोलीस स्थानक) यांचा समावेश आहे.
सुरुवातील डीजीपी मिणा यांनी परेडची पहाणी केली. यावेळी मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. रायझींग डे कार्यक्रमात आजी माजी पोलीस अधिकारी तसेच इतर मान्यवर व पोलीस कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









