नवी दिल्ली
शाओमीचा उपब्रँड पोकोने पोको एम थ्री स्मार्टफोन नुकताच बाजारात दाखल केला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 662 एसओसी प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा यासह येणाऱया या स्मार्टफोनची किंमत 11 हजाराच्या घरात असणार आहे. यापूर्वी कंपनीने एम सिरीजअंतर्गत फोन दाखल केले होते. त्यात एम टू व एम टू प्रो हे दोन फोन बाजारात कंपनीने आणले होते. 11 हजार किंमतीचा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह तर 12 हजार 500 रुपयांचा फोन 128 जीबी स्टोरेजसह येणार आहे. निळा, पिवळा व काळय़ा रंगात हा फोन 27 नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल.









