प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यातील निगुंडळ येथील क्वॉरीवर असलेल्या पोकलेनच्या 7 लाख किंमतीच्या साहित्याची चोरी झाल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोकलेन चालकाविरोधात चोरीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोकलेनचे मालक आनंदा जगदाळे यांनी या बाबत गुहागर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. आनंदा जगदाळे हे मुळचे पेडगाव येथील असून सध्या निगुंडळ मोहल्ला येथे रहात आहेत. निगुंडळ येथील अवधुत वेल्हाळ यांच्या क्वॉरीच्या साईटवर काम करत असलेल्या पोकलेचे कंट्रोल वॉलचे 6 पिस्टन, स्वींग मोटरचे 4 पिस्टन असे एकूण 7 लाख किंमतीच्या साहित्याची चोरी झाल्याचे म्हटले आहे. मंगळवारी रात्री 9.30 ते बुधवारी सकाळी 7 या कालावधीत या साहित्याची चोरी झाली असून पोकलेन चालक किशोर महतो (रा. झारखंड) याच्याविरोधात चोरीचा गुन्हा गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉस्टेबल हनुमंत नलावडे करत आहेत.









