वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोरोना विषाणूच्या महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशातील विविध कार्यालयामधील महत्वाची कामे खोळबंली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आर्थिकसोबत अन्य क्षेत्रातील घटकांचा समावेश होत असल्याचे समोर आले आहे. परंतु या संकटातही आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी देशातील भारतीय जीवन विमा निगमकडून(एलआयसी) मॅच्युरिटी क्लेम मिळविण्यासाठी ग्राहकांना घर बसल्या सुविधा प्राप्त करुन देण्यात आल्याची माहिती एलआयसीकडून देण्यात आली आहे.
एलआयसी आता आपल्या ग्राहकांकडून लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही कार्यालयात न येता घरातूनच मॅच्युरिटी क्लेमसाठी अर्ज दाखल करु शकणार आहेत. पॉलिसीधारकांना पॉलिसी, केवायसीचे दस्ताऐवज, डिस्चार्ज फॉर्म आणि अन्य कादगपत्राची प्रत स्कॅन करुन ईमेलवरून संबंधीत एलआयसी कार्यालयात पाठवून दिल्यास हा क्लेम मंजूर करण्याची सोय येत्या 30 जूनपर्यंत ग्राहकांना मिळणार आहे.
सदरची प्रक्रिया करण्यासाठी एलआयसीच्या वेबसाईटच्या आधारे ईमेलवरुन मॅच्युरिटी आणि अन्य क्लेमसाठीची विनंती ग्राहकांना bo@licindia.com पाठविता येणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. शाखा कोडच्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाखेचा कोड मात्र ग्राहकाला द्यावा लागणार आहे.
अन्य बाबी महत्वाच्या
स्कॅन करण्यात येणाऱया कागदपत्रांचा आकार 5 एमबीपेक्षा अधिक नसावा, स्कॅन केलेली कागदपत्रे जेपीइजी आणि पीडीएफ फॉरमॅटमध्ये देणे बंधनकारक आहे. वरती दिलेल्या ईमेल आयडीचा वापर फक्त क्लेम रिक्वेस्ट पाठविण्यासाठी करता येणार आहे.









