जिल्हाशल्यचिकित्सकडॉ.अशोकबोल्डेयांचीमाहिती
जिल्हय़ातील 19 जणांचे रिपोर्ट रविवारी निगेटीव्ह आले असून यातील तबलिगी जमातीतून आलेल्या पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 13 रूग्णांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. तसेच रविवारी राजीवडय़ात आरोग्य तपासणी मोहीम सुरळीतपणे पार पडल्याचीही माहिती डॉ. बोल्डे यांनी दिली.
कोरोनाचा नवा रूग्ण राजीवडा परिसरात आढळल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली. या रूग्णाच्या संपर्कात आलेले रेल्वेतील 4 जण आणि राजीवडय़ातील 9 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत तर पॉझिटीव्ह रूग्णावर शासकीय रूग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. राजीवडापासून 3 कि.मी.च्या आत असणाऱया सर्व घरातील लोकांची तपासणी मोहीम आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी 41 आरोग्य कर्मचाऱयांची टीम नेमण्यात आल्याची माहिती डॉ. बोल्डे यांनी दिली.
आरोग्य तपासणी मोहिमेला प्रतिसाद
शनिवारी राजीवडय़ात नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱयांना तपासणीसाठी मज्जाव केला होता, मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह प्रशासनाने शांततेचे व सहकार्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रविवारी येथील नागरिकांनी तपासणी मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याचे डॉ. बोल्डे यांनी सांगितले.
सिव्हीलमधील 24 पैकी 19 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात 24 संशयित रूग्ण हे क्वॉरंटाईनमध्ये होते. यातील इतर 6 रूग्णांचे रिपोर्ट आणि पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 13 रूग्णांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यामुळे रविवारी एकूण 19 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे डॉ. बोल्डे यांनी सांगितले.









