प्रतिनिधी /पेडणे
रविवार पावसामुळे पेडणे तालुक्मयात विविध ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांची मोठं मोठी झाडे उमळून पडल्याने बरीच धावपळ झाली . एका बाजूने मोठा पडत असताना जीवाची पर्वा न करता पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठी कामगिरी केली .
सकाळी 6 वाजता भूतवादी येथे रासत्यावर झाड पडल्याने खोळंबा झाला . त्यानंतर व्हायडोंगर पार्से येथे रस्त्याचा मधोमत आंब्याचे झाड पडल्याने अग्निशामक दलाला बरीच कसरत करावी लागली.नंतर खलचावाडा विर्नोडा येथे रुक्मिणी हरीजन याच्या घरावर मोठे भेंडीचे झाड पडल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी घराला मोठे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली. या घरावरचे भेंडीचे झाड सावधगिरी बाळगून अग्निशामक दलाच्या जवानांनी भेंडीचे झाड कापून बाजूला केले. व मोठी दुर्घटना होण्यापासून घर वाचवण्यात आले. ही कामगिरी, जवान अमोल परब ,रतन परब ,व विकास चौव्हाण यांनी अग्निशामक दलाचे सहायक अधिकारी व हवालदार फटू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, जवानांनी घराची तीन लाखाहून मालमत्ता वाचवली ,यात मोठे योगदान जवान अमोल परब, रतन परब व विकास चव्हाण ,यांचे लोकांनी कौतुक केले.









