सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांना वंचित
पेडणे ( महादेव गवंडी )
गणेश चतुर्थी सणाच्या काळात घरातील दीड दिवशीय तसेच सात दिवशीय गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर भाविकांना ओढ लागलेली असते ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या आणि होणाऱया सांस्कृतिक , धार्मिक , शैक्षणिक तसेच इतर बौद्धिक आणि आत्मकि समाधान देणाऱया कार्यक्रमांची. माञ यंदा या सर्व कार्यक्रमांपासून वंचित राहावे लागले आहे. कोरोनाच्या रुपाने जागतिक संकट आल्यानंतर देशातील आणि राज्यातील धार्मिक , सामाजिक , राजकीय , शैक्षणिक तसेच इतर सर्व स्तरावर होणाऱया जाहिर कार्यक्रमावर बंदी असल्याने पेडणे तालुक्मयातील सार्वजनिक मंडळाने दीड दिवाशीय गणपतीची प्रति÷ापना केली होती . त्यामुळे अनेक गणेश भक्तांना कोरोना महामारी संकटामुळे निराश केले आहे.
पेडणे तालुक्मयातील पेडणे बाजारपेठेतील श्री भगवती मंदिर सभागृहात पेडणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पूजण्यात आलेला एकमेव गणपती हा यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने कुठलेही कार्यक्रम आयोजित न करता अकरा दिवस ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला. एक गणपती वगळता सर्व तालुक्मयातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपतींचे दीड दिवासानी विसर्जन करण्यात आले.
ड़ पेडणे तालुक्मयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे एक डझनच्या वर
पेडणे तालुक्मयात एक डझनच्यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळातर्फे दर वषी शेकडो सांस्कृतिक , धार्मिक , शैक्षणिक , बौद्धिक भूक भागविणारे आणि मनोरंजन करणारे कार्यक्रम आयोजित केले जायचे. बहुतेक मंडळे अकरा दिवशीय गणपतीचे प्रति÷ापना करायचे.माञ कोरोनाचे संकट आणि गोव्यात दरदिवशी मिळत असलेल्या वाढत्या कोरोना बाधितांची संख्या याची धास्ती सर्वानीच घेतल्याने आणि सरकारने सार्वजनिक कार्यक्रमावर घातलेली बंदी यामुळे पेडणेतील सर्व मंडळाने आपला गणपती दीड दिवसांनी विसर्जन केले. तसेच सर्व कार्यक्रम रद्द केले.
ड़ कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी भाविक आणि रसिक मुकले , मंडळाच्या गणपती स्थळांकडे यंदा भाविकांचे पाय वळणार नाहीत
पेडणे तालुक्मयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातार्फे तसेच घरातील प्रति÷ापीत करत असलेल्या गणपतीसाठी विविध धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल अकरा दिवस असायची. दर्जेदार भजनी पथकांकडून भजन सदरीकरण फुगडी स्पर्धा यातून महिलांना कला सादर करण्यासाठी मिळत असलेले व्यासपीठ , दशावतारी नाटय़ प्रयोगांची मेजवानी, अभिजात संगीत नाटय़ प्रयोग, तालुक्मयातील दहावी बारावी तृसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव , रांगोळी स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, कीर्तने, व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांद्वारे रसिकांना तृप्त करण्याचे काम तसेच समाज प्रबोधनाचे काम या मंडळाच्या माध्यमातून होत होते यातून हजारो कलाकाराना व्यासपीठ मिळत होते. अनेकांना या उत्सवा निमित्ताने मानधनाच्या रुपाने आर्थिक कमाई होत होती . आपल्या घरातील गणपतीचे विसर्जन केल्यानंतर भाविकांची पाऊले हे सार्वजनिक मंडळाच्या तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांकडे वळत असे. जोशपूर्ण आणि उत्साही वातावरण असायचे माञ यंदा तो उत्साह तो जोश आणि मंडळाच्या मंडपात होणारी गर्दी दिसणार नाही.
ड़ कोरोनामुळे नातेवाईक, मिञ मंडळी यांची वर्दळ कमी
दरवषी गणपती सणाला प्रत्येकाच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईक , मिञ , वाडय़ावरील भाविक , शेजारी तसेच इतर भाविकांची वर्दळ घरात असायची यंदा ती वर्दळ कोरोनामुळे दिसली नाही. मनात इच्छा आणि गणपती बद्दल असलेली ओढ असून सुध्दा भाविकांनी दुसऱयांच्या घरात गणपती दर्शन घेण्यासाठी जाण्याचे टाळले.
ड़ आतषबाजी कमी झाल्याने प्रदुषण टळले
गणपती सणाच्यावेळी दरवषी मोठय़ा प्रमाणात प्रत्येक जण दरवषी आपल्या परीने आतषबाजीवर खर्च करत असे.यंदा माञ खूपच कमी प्रमाणात आतषबाजीवर खर्च केला गेला. फटाके , बा?म्ब नारिंगे, फुलवाती , गोलचपे यांच्यावर खूपच कमी प्रमाणात खर्च केला गेला. त्यामुळे ध्वनी प्रदुषण टळले.
ड़ ध्वनी प्रदुषण कमी
चतुर्थीच्या सणावेळी पाच दिवस , सात व त्यापेक्षा जास्त दिवस प्रति÷ित करण्यात येत असलेल्या घरातील गणपतीसाठी भजन , घुमट आरती तसेच सत्यनारायण महापूजा आदी कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात घराघरात होत होते. माञ करोनामुळे आणि सरकारने घातलेल्या ध्वनी प्रदुषणावरील बंदी व सामाजिक अंतर यामुळे यंदा ध्वनिक्षेपक ऐकू आला नाही.ऐरवी प्रत्येक वाडय़ावर ध्वनिक्षेपकांचा आवाज असायचा त्यामुळे ध्वनी प्रदुषण होत होत माञ यंदा ते टळले.
ड़ भटजीच्या परंपरेला बसला फाटा , भटजींचे उत्पन्न बुडाले
गेली अनेक वर्षे पेडणे तालुक्मयात सर्वञ गणपती सणाला गणपतीची पूजा करण्यासाठी तसेच सत्यनारायण महापूजेसाठी भटजी परंपरेनुसार यायचे. माञ कोरोनाचे संकट आल्याने आणि कोरोनाच्या भितीपोटी यंदा गणपतीची पूजा करायला जाण्याचे भटजीनी टाळले. यंदा भटजी नसल्याने भाविकांनी सोशल माध्यम यांचा वापर करत भटजीकडून तसेच विडिओ पाहून आणि पुरोहित यांनी भ्रमणध्वनी वरुन पूजा करण्याचे सांगितलेले नियमाचे पालन करत यंदा गणपतीची पूजा केली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात चतुर्थी सणा दरम्यान आर्थिक मिळकत असलेल्या भटजीचे उत्पन्न बुडाले.
पाच दिवशीय गणपतींचे भक्तिभावे सरकारी नियमांचे पालन करत केले विसर्जन
पेडणे तालुक्मयात पाच दिवशीय प्रति÷ापना केलेल्या गणपतीचे बुधवारी भक्तिभावे भाविकांनी विसर्जन केले. कोरोनामुळे सरकारने घातलेले निर्बंध आणि सामाजिक अंतर , तोंडाला मास्क आदी नियमांचे पालन करत घरातील गणपतींचे बुधवारी भक्तिभावे विसर्जन करण्यात आले. पेडणे तालुक्मयातील वीस पंचायती व एक पालिका क्षेत्रातील भाविकांनी आपल्या घरातील पाच दिवशीय गणपतींचे विसर्जन आपल्या गावातील पारंपारिक विसर्जन स्थळांवर केले. तेरेखोल नदी पाञाशेजारी असलेल्या भाविकांनी तेरखोल नदीपाञात, समुद्र किनारी असलेल्या हरमल , केरी, मोरजी, मांदे येथील भाविकांनी समुद्रात तर ज्यांना जवळ नदी समुद्र नाही अशा भागातील भाविकांनी तलाव , ओहळ विहिरीत गणपतींचे विसर्जन केले.
ड़ यंदा गणपतींचे विसर्जन सायंकाळी लवकरच
ऐरवी गणपती विसर्जन करण्यासाठी काही भागात राञीचे आकरा , बारा वाजातात. माञ यंदा भाविकांनी सायंकाळीच काही ठिकाणी गणपतींचे विसर्जन केले. सामाजिक अंतर राखत तसेच एकञ गर्दी न करता गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
ड़ मांदे पंचायत क्षेत्रातील भाविकांनी पंचायत आणि नागरिकांनी गणपती विसर्जन करण्यासाठी तयार केलेल्या वेळापञकानुसार विसर्जन केले. तर काही पंचायत क्षेत्रातील भाविकांनी आपणच स्वतःवर बंधने घालत गणपतींचे विसर्जन केले.









