पेडणे (प्रतिनिधी )
दरवषी पेडणेतील दसरोत्सव आणि पुनवेला गोव्याच्या विविध भागातून आणि महाराष्ट्रात कर्नाटक तसेच इतर राज्यात विखुरलेले लाखो भाविका पेडणेतील दसरोत्सव व पुनवेला येऊन देव दर्शन तसेच देवाचा कौल घेतात.यंदा माञ शेकडो वर्षांची परंपरा असलेला या दसरोत्सव व पुनव उत्सवावर कोरोना संकट असल्याने सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार यंदा हा उत्सव देवस्थान समितीने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने भाविक या उत्सवाला मुकले तर आज होणार पुनवेच्या पारंपरिक काही विधीवरही मर्यादा असल्याने यंदा ही पुनव मर्यादित स्वरुपात साजरी होणार आहे.
यंदा भुते काढणार नाहीत , अनेक वर्षांच्या परंपरेला खंड
गेली शेकडो वर्षे पेडणेतील पुनवेला भुते काढली.जायची हे या पुनवेचे मुख्य आकर्षक असायचे.माञ यंदा या भुते काढण्याच्या प्रकाराला फाटा देण्यात आला आहे. देवीची यंदा ओटी भरणे नाही, तुळाभार नाही तसेच सार्वजनिक कौल नाही.
पेडणे पुनवेला दरवषी विविध प्रकारची दुकाने थाटली जायची. खाजे , खोळणी , भांडी , मुलासाठी खेळण्यासाडी व्हील ज्याईट , भांडय़ाची दुकाने आदी फेरी भरायची ही.फेरी आठ ते दहा दिवस असायची .माञ यंदा एकही दुकान मंदिर परीसरात लावण्यात आले नाही.









