प्रतिनिधी/ चिकोडी
पेट्रोलच्या वाढत्या दराचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून काँग्रेसने पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला अनुसरून चिकोडी विभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपासमोर जात पेट्रोल दरवाढीचा निषेध करीत निदर्शने केली. त्यानंतर शहरातील बसवेश्वर सर्कल येथे राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असून त्यांच्यामुळेच महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असून केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार व कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार राज्यभरात निदर्शने करण्यात येत असल्याची माहिती लक्ष्मण चिंगळे यांनी दिली. यावेळी जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे गुलाबहुसेन बागवान, महावीर मोहिते, महेश हट्टीहोळी, सुनिता ऐहोळे, कादर कमते, शब्बीर जमादार, महंमदइसा नाईकवाडी, दस्तगीर कागवाडे, शानूर तहसिलदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.








