नवी दिल्ली
पेटीएमचा आयपीओ येत्या 8 नोव्हेंबरला भारतीय भांडवली बाजारात सादर केला जाणार असून आयपीओतून उभारण्यात येणाऱया रक्कमेच्या उद्दिष्टात कंपनीने वाढ केली आहे. दरम्यान आता पेटीएम आपल्या आयपीओतून 18 हजार 300 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. या आधी कंपनीने 16 हजार 600 कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. सेबीने सदरच्या आयपीओला मंजुरी दिली असून 8 नोव्हेंबरला आयपीओ खुला होऊन 10 नोव्हेंबरला बंद होणार आहे.









