पुलाची शिरोली / वार्ताहर
अज्ञात वाहनाच्या धडकेत अॅक्टीव्हा मोपेड गाडीवरील प्रतिक्षा प्रकाश मिणचेकर (वय-४५, रा.लालबहाद्दूर हौसिंग सोसायटी शिरोली, ता. हातकणंगले) ही महिला परिचारिका जागीच ठार झाली. हा अपघात पुणे-बंगलूर राष्ट्रीय महामार्गावर बुधले मंगल कार्यालया समोर काल, शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता घडला.
सदर मयत झालेली महिला राञी उशिरा कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यातून काम आटोपून घरी (MH 09 DG 5021) या अॅक्टीव्हा मोपेड गाडीवरून जात होती. बुधले मंगल कार्यालया समोर ती असता अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक बसली. यात ती महिला रस्त्यावर पडली व तिच्या डोक्यावरुन वाहनाचे चाक गेले त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती. शिरोली पोलिस राञी उशिरा घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









