पूजा बत्रा काही हिंदी चित्रपटांमध्ये झळकली. उंच, सडपातळ बांध्याची पूजा भाव खाऊन गेली. आज वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षीही तिने आपला बांधा जपला आहे. पूजा आजही तशीच सडपातळ आहे. चला तर मग, पूजाच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेऊ.
पूजाने योगासनांवर भर दिला आहे. योगा करतानाचे बरेच फोटो आणि व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिने मध्यंतरी उष्ट्रासन करतानाचा फोटो शेअर केला होता. उष्ट्रासन म्हणजे कमळासारखी पोझ. या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक होतो.
पूजा चक्रासनही करते. विशिष्ट शारीरिक स्थितीमुळे निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी चक्रासन करायला हवं असं ती सांगते. पूजाला पद्ममयुरासन करायला खूप आवडतं. पद्ममयुरासन थोडं कठीण असलं तरी पुरेशा सरावानंतर ते जमू लागतं.
पूजा शीर्षासनही करते. पूर्ण शीर्षासन जमणार नसेल तर ट्रायपॉड हेडस्टँड करता येईल. सुरुवातीच्या टप्प्यात या भिंतीचा आधार घेऊन हा व्यायाम करता येईल. हा व्यायामप्रकार करण्यासाठी हटयोगी बनण्याची आवश्यकता नाही, असं पूजा सांगते. पूजा ब्रिज पोझही करते. या आसनामुळे पोट, कंबर आणि मांडय़ांवरील चरबी कमी व्हायला मदत होते.









