पुलाची शिरोली / वार्ताहर
पुलाची शिरोली येथील दारुल उलुम मदरसामधील नूर ए रसुल फाऊंडेशन संचलित कोविड केअर सेंटरला जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर महापालीकेतर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल, शहरातही अशा प्रकाराचे कोविड सेंटर सुरु करावे, असे आवाहन कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
ते पुलाची शिरोलीतील मदरसामधील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर अजरेकर होत्या. या कोवीड सेंटरचे उद्घाटन महापौर निलोफर अजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांचे हस्ते झाले.
नूर ए रसुल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. असिफ सौदागर म्हणाले, ‘सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्य रुग्णांना परवडेल, अशा किंमतीत हे केअर सेंटर सुरु केले आहे. जनरल बेड ५० आणि अॉक्सिजनचे ५० बेड असे १०० रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार केले जातील. आवश्यकता वाटल्यास आणखी बेड वाढवण्यात येणार आहेत. उपचारासाठी तंज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी २४ तास उपलब्ध असणार आहेत. महापौर अजरेकर म्हणाल्या, ‘शिरोली मदरसा आणि मुस्लिम बोर्डींग, नूर फाऊंडेशन नेहमी संकट काळात मदतीसाठी तत्पर असते.‘
डॉ. योगेश साळे, नगरसेवक नियाज खान, कादर मलबारी, डॉ. शकील महाबरी यांनी मनोगत व्यक्त केले. गणी अजरेकर, डॉ. फारुक देसाई, स.पो.नि. किरण भोसले, रहिद खान, हाजी अस्लम सय्यद, फिरोज महात, अय्याज बागवान, फारुक मुल्ला, डॉ. वाहिद सौदागर, डॉ. सना नसिर हजारी आदी उपस्थित होते.
Previous Articleहे विघ्नहर्त्या, विघ्न हरण कर!
Next Article ट्रायचे ब्रॉडबँड स्पीड वाढविण्याचे ध्येय









