पुलाची शिरोली/ वार्ताहर
येथील किरकोळ दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी दूधविक्री बंद केली आहे. त्यामुळे रविवारी दुध न मिळाल्यामुळे अनेकांचे हाल झाले. विषेशतः लहान मुलांना दुध- दुध म्हणण्याची वेळ आली आहे.
शिरोली गावाची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार इतकी मोठी आहे. त्यामुळे शिरोली गावात वेगवेगळ्या संघाची दूधविक्री करणारे सुमारे दहा विक्रेते आहेत. त्यांच्यामार्फत शिरोली व एमआयडीसी परिसरात दररोज सुमारे आठ हजार लिटर दूध विक्री केली जाते. यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर जिल्हा सहकारी ( गोकुळ) दुध संघाचे सुमारे पाच हजार लिटर दूध विक्री होते.
पण या सर्वांनी रविवारी विक्रीसाठी दूधाची मागणी केली नाही. त्यामुळे गावातील अनेक घरातील लोकांना दूध मिळू शकले नाही. शिरोली औद्योगिक वसाहत, गोडावून, हाँटेल्स, पेट्रोल पंप , मार्बल व्यवसाय अशा अनेक ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची संख्या प्रचंड आहे. या सर्व लोकांना व त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांना रविवारी दुधा पासून वंचित राहावे लागले आहे.
या विक्रेत्यांनी दूध हे जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहे. गावात अत्यावश्यक सेवा नियमित सुरु असताना या विक्रेत्यांनी दूध वाटप का ? केले नाही. याची प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी अशी नागरीकांच्यातून मागणी होत आहे.
Previous Articleनेसरीत दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई
Next Article चर्चा ‘कोरोना’ची, मृत्यू अन्य कारणाने









