प्रतिनिधी / बेळगाव
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सेवाभारती यांच्यातर्फे कोरोना काळात सुरू असलेली सेवा उल्लेखनीय आहे, असे मत बेळगाव पुरोहित (हव्यक) संघाचे प्रमुख भास्कर कडेकोळी यांनी व्यक्त केले.
संघातर्फे त्यांच्यासह अनंत हेगडे, शांता हेगडे यांनी सदर संस्थांतर्फे चालवल्या जाणाऱया कोविड केअर सेंटरला भेट दिली. मोदी बिल्डिंग येथे कार्यक्रमात पुरोहित (हव्यक) संघातर्फे शांता हेगडे यांनी संघ परिवाराचे आभार मानले व संघातर्फे 1 लाख 51 हजारची देणगी दिली. यावेळी कृष्णा भट्ट यांनी आजपर्यंत विलगीकरण केंद्र, रुग्णवाहिका सेवा, सफाई कर्मचाऱयांसाठी मदत व 250 हून अधिक अंत्यसंस्कार विधी अशा प्रकारे कार्यकर्ते कार्य करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी शहर संयोजक रोहित देशपांडे, संपर्क प्रमुख गुरुदत्त कुलकर्णी, विहिंपचे प्रांत सहकोषाध्यक्ष कृष्णा भट्ट, विद्या भारतीचे परमेश्वर हेगडे, अच्युत कुलकर्णी, शहर अध्यक्ष बसवराज भागोजी, जिल्हा सचिव विजय जाधव आदी उपस्थित होते.









